राजे व ब्राह्मणवर्ग बौद्धांपेक्षा वेगळा धर्म प्रचलित करण्याचा प्रयत्न करीत होते तरी तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बहुजन समाज त्यांच्या धर्माला मानत नव्हता
इ.स. पूर्व दुसऱ्या शतकानंतर आर्यांनी या देशावर वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली.

धर्म, वर्ण, जात यांचा संकल्प मंत्रात उल्लेख नाही नुकतेच संकल्प मंत्राचे भाषांतर दिले. त्यात सृष्टीच्या उत्पत्तीक्षणापासून तो सदर धार्मिक विधी करण्याच्या काळापर्यंत कोणते कल्प, कोणता मनु, कोणते युग, त्या युगातील कोणते वर्ष यापासून तिथी, पक्ष, वार, आयन, वगैरेचा उच्चार करण्यास सांगितले आहे नंतर ज्या स्थळी सदर कृत्य केले जावयाचे त्या स्थळाचा उल्लेख निर्देश करण्यासाठी जम्बू द्वीप, भरत वर्षे, भारत खंडे, गोदावर्या दक्षिण तीरे, दंडकारण्ये वगैरेचा उच्चार करावयाला सांगितले आहे. अन् नंतर जी व्यक्ती (पुरुष) सदर कृत्य करते, त्याच्या गोत्राचा उच्चार करुन पुढे मग त्याचा पणजा, आजा, बाप व कृत्यकर्ता यापैकी आवश्यकतेनुसार कुणा-कुणाचे उल्लेख करण्यास सांगितले आहेत. परंतु ज्या चार वर्णाचा डंका पिटला जातो, त्याचा उल्लेख या संकल्प मत्रात नाही. तसेच कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. व धर्माचाही नाही. चार वर्ण व त्या वर्ण संकरातून निर्माण झालेल्या हजारो जाती यांचा समुदाय म्हणजे हिन्दू धर्म अस सरकारी माध्यमातून सुद्धा सांगण्यान येते. अन् ब्राह्मण पंडीताकडून सुद्धा सांगण्यात येते. असं असताना संकल्प मंत्रात स्थळकाळ याच्या जाडीने धर्म, वर्ण व जात यांचा उच्चार करण्यास सांगणारे विधान हवे होते. (उदा. मी हिन्दू अथवा वैदिक धर्मातील xxx (क्षत्रिय वगैरे) वर्णातील xxx जातीत (मराठा, कुणबी वगैरे) xxx गोत्रात (काश्यप, भारद्वाज वगैरे) पित्याचे पोटी जन्मास आलेला x x x नामक व्यक्ती सदर धर्मकार्य करत आहे. असं संकल्प मंत्रात हवं होतं. पण संकल्प मंत्रात फक्त गोत्राचा उल्लेख आहे. वर्ण, जात व धर्म यांचा उल्लेख नाही. गोत्र, गोठा, गोकूल, गोत्र याच स्पष्टीकरण करताना सागितल आहे की, ज्या काळी भटके जीवन जगणारी संस्कृती होती त्या वेळी अस भटके जीवन जगणारे लोक टोळ्या करुन रहात पुराणे व वेद यावरुन दिसून येते की, वेद संस्कृतीचे लोक आपल्या टोळ्यांना गोत्र म्हणत. व त्या गोत्रांचा जो प्रमुख त्याच्या नावांने ते गोत्र ओळखले जावयाचे. पुढे जो पहिला गोत्र प्रमुख म्हणून मानण्यात आला, त्याच्या पश्चात गोत्र प्रमुखाच्या पदावर येणारी व्यक्ती ही पहिल्या गोत्रकर्त्याच्याच नांवाने ओळखण्याची वहिवाट पडली. म्हणून वसिष्ठ, अमी कश्यप अशा असंख्य नावाच्या व्यक्ती वेगवेगळ्या राजघराण्यातील अनेक पिढ्यांत वावरताना दिसतात. वस्तुतः तो मूल गोत्रकर्ता नसतो तर त्या पदावर आरुढ झालेला दहाव्या किंवा विसाव्या किंवा तिसाव्या पिढीतील माणूस असतो व राजाचा पुरोहित कम् राजगुरु म्हणून काम करतो. सिंधू परिसरापर्यंत ही गोत्र कल्पना प्रबळ होती. (फक्त आर्यामध्ये) गंगा-यमुना प्रदेशात गोत्र कल्पना नव्हती. तिथं गोकुळ (गो-कुळ) संस्कृती होती. ही मूल निवासी लोकांची जीवन पद्धती. श्रीकृष्ण पिता वसूदेव व कृष्णाचा पालनकर्ता नंद हे दोघे सम वयस्क. पण नंद हा भटक्या गोप अथवा गोकुळ संस्कृतीचा होता. याच संस्कृतीमधील सुधारलेले लोक म्हणजे उग्रसेन कंस, वसुदेव वगैरे लोक. एकाच वेळी स्थिर व भटक्या वसाहती नांदत असण्याचा तो काळ (कृष्णाच्या वेळचा).

चंद्रगुप्त मौर्याच्या वेळी सुद्धा स्थिर वसाहती व भटक्या वसाहती असे दोन्ही प्रकारचे समाज जीवन जगणारे लोक अस्तित्वात होते असे मॅगेस्थिनिस याने लिहून ठेवले आहे. जेव्हा बहुतांश मूलनिवासी लोकांनी भटक्या जीवनाचा त्याग करुन स्थिर वसाहत संस्कृतीचा अवलंब केला तेव्हा त्यांना आपली ओळख पटवून देण्यासाठी गोकुळ या संज्ञेची काही गरज राहिली नाही. अशी गरज त्यांना जेव्हा होती की त्यांना गाव-वाडी वगैरे काही नव्हते. भटके जीवन जगणाऱ्या एका टोळीतील माणसाना जर दुसऱ्या भटक्या टोळीतील माणसाचा परिचय करुन घ्यायचा असेल तर ते त्यांना तुमचं गोत्र कोणतं अशा अर्थाचा प्रश्न आर्यात विचारला जाई व मूलनिवासी लोक असं विचारीत की तुझे गोकुळ कोणते. काळाच्या ओघात आर्यानी देखील स्थिर वसाहतवादाचा स्वीकार केला. मूलनिवासी लोकांनी देखील केला मग ज्या ठिकाणी वसाहती केल्या जात त्याना ग्राम असं अभिधान देण्यात आले ग्राम हा शब्द अस्तित्वात आल्यावर टोळीवाचक गोकुळ किवा गोत्र या शब्दाची गरज राहिली नाही म्हणून अमुक व्यक्ती कोणत्या गोकुळाची अथवा गोत्राची असं विचारण्याऐवजी अमुक मनुष्य कोणत्या गावचा असं विचारण्याचा प्रघात सुरु झाला. पण आर्य कसले निगरगट्ट। ते आपल्या अक्षर शत्रुत्वाला जिथ गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुगळ्याप्रमाणे चिकटून राहिले, तसेच आपल्या गोत्राला चिकटून राहिले. जरी ते गांव वसाहत करुन राहिले. तरी धर्म विषयक कर्मकांड करताना स्थळाचा उल्लेख टाळून गोत्रांचा उल्लेखच करु लागले. मूलनिवासी लोकांनी मात्र कालबाह्य ठरलेल्या ‘गोकुळाचा’ उल्लेख आपल्या धर्मकृत्यात येऊ दिला नाही. गोत्रचा अर्थ गोठा. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकानंतर आर्यांनी या देशावर वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली. वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांनी पहिला हल्ला केला तो जबरदस्त होता. (मौर्य साम्राज्य खालसा करणे) पण १६० वर्षांनी सातवाहन राजानी ब्राह्मणांवर डाव उलटला व त्यांची राजवट नष्ट केली, तेव्हा पासून मोठी सावधगिरी बाळगून ब्राह्मण आर्य इथल्या लोकांवर वर्चस्व गाजविण्याचा मार्ग शोधू लागले अन् तीन-चारशे वर्षे खटपटी केल्यावर त्यांना तो मार्ग सापडला. हा मार्ग म्हणजे राजगुरुपदाचा राजापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ असतो व ब्राह्मण सांगेल तसे राजाने ऐकावे असं धर्ममत या काळात पुढे आले. अन् त्या वेळच्या गुप्त राजांनी ते मान्य केले. असं हे मत मान्य करणे म्हणजे आपण मूलनिवासी लोकांचे राजे असलो तरी ब्राह्मणांचे गुलाम झालो ही गोष्ट या गुप्तवंशी राजांच्या डोक्यात शिरली नाही. ते यज्ञयागाच्या देखाव्याला भुलले, यज्ञयाग केल्याने लाभणाऱ्या प्रलोभनाला भुलले व भट सांगतील ते विधी धर्मकृत्य (देवकार्य) म्हणून करु लागले. व त्यांचे अनुकरण प्रजाजन करु लागले. गजनीच्या महंमदाची गोष्ट कशाला? आपल्या भारताची अवस्था काही या पेक्षा वेगळी नव्हती. राजे व ब्राह्मणवर्ग बौद्धांपेक्षा वेगळा धर्म प्रचलित करण्याचा प्रयत्न करीत होते तरी तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बहुजन समाज त्यांच्या धर्माला मानत नव्हता. महाराष्ट्रात विठोबाच्या रुपाने याचा मोठा पुरावा उपलब्ध आहे. तेराव्या चौदाव्या शतकातील संताच्या अभंगाकडे पहा- नामदेवाचे बागूल काव्यातील पुढील काव्य पंक्ती अशा आहेत. “नववा बागूल बोलती। नाव बौद्ध म्हणती ।। कोण नकळे त्याची गती। बौद्ध रुपे राहिला ।। जनाबाई म्हणते”…. अर्धनारी नटेश्वर । दुसरा तो वामन । भार्गव निधान । दाशरथी । होऊन कृष्ण कंस वधियेला। आता बौद्ध झाला सखा माझा ।। नामदेवाच्या आणखी एका अभंगातील काव्यपंक्ती-बौद्ध अवतार चक्रपाणी । सत्रावी कला माय रुक्मीणी। जाणत असे अंतःकरणी । भक्त इच्छा ।। सोळाव्या शतकातील एकनाथ म्हणतो – लोक देखोनि उन्मत्त दारा धनी आसक्त न बोले बौद्ध रुप ठेविले जघनी हात ।।९।। पुढे म्लेंच्छ संहार म्हणोनि करकटी । एका जनार्दनी पाहता घातली मीठी ।।१०।।। सोळाव्या शतका पर्यंत तरी असे दिसते की बुद्धाला परधर्मी म्हणावयाचे कुणाच्या मनात येत नसे. इथं कुणाच्या या शब्दाचा अर्थ ब्राह्मणेतराच्या असा घ्यावा. एकनाथ हा मतलबी माणूस होता. बहुजन समाज बुद्धाला देव मानतो म्हणून त्याने एका अभंगात बुद्धाला देवाचा अवतार म्हटले खरे पण ते ‘पाप’ धुऊन काढण्यासाठी दुसरा प्रचंड लांबी असलेला अभंग लिहिला अन् त्यातून बुद्धाला काढून टाकला. महाराघरी भोजन करुन आपण अस्पृश्यता पाळत नाही अस नाटक करावयाचे, अन् लगेच महारा घरच्या भोजनामुळे जी धर्मभ्रष्टता आली ती घालविण्यासाठी प्रायश्चित घेऊन आपले ब्राह्मण्य अबाधित राखावयाचे, असा कावेबाज हा एकनाथ होता. पण त्याला विठोबाचे बुद्धत्व मान्य करावयाला लागले हा मुद्दा महत्वाचा. त्यावरुन सोळाव्या शतकापर्यंत बुद्धमताचा प्रभाव इथल्या जनतेवर होता हे दिसून येते. एकनाथ पूर्वी तीनशे वर्षे या काळामध्ये संत नामदेव व संत जनाबाई ही गुरु-शिष्य होऊन गेली. त्याच काळातील ज्ञानेश्वरी कर्ता ज्ञानदेव ।
क्रमशः
– दिनेश बोधिराज ( संपादक, आम्ही भारतीय साप्ताहिक )


