चळवळ

नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्यासाठी ५ जिल्ह्यांतील भूमिपुत्रांचा ७ जुलै रोजी मंत्रालयावर भव्य पायी मोर्चा !

दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरूच

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील (दिबा) यांचेच नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल-उरणमधील भूमिपुत्रांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. “रक्ताचे पाणी झाले तरी मागे हटणार नाही, विमानतळाला दिबांचेच नाव द्या” अशी ठाम भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.

दिबा समर्थक रश्मिता पोपेटा यांनी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण सुरू केले आहे प्रकल्पग्रस्तांचा लढा। प्रकृती खालावली तरीही, “विमानतळावर दि. बा. पाटील यांचे नाव झळकल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्धार त्यांनी केला आहे. आमरण उपोषण जासई येथील बैठक: नामकरणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जासई येथील दि. बा. पाटील सभागारात भूमिपुत्र आणि सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

मंत्रालयावर निघणार पायी मोर्चा

ठोस निर्णयासाठी ५ जिल्ह्यांतील भूमिपुत्रांचा ७ जुलै रोजी मंत्रालयावर भव्य पायी मोर्चा काढणार आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नामकरणासाठी सिडको आणि सरकारला इशारा देत मोर्चाची जोरदार तयारी. लवकरात लवकर दि. बा. पाटील यांच्या नामांकनाचा अंतिम निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.

1957 च्या सुमारास ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं, त्यावेळी पनवेल, अलिबाग भागातून दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सीमेवर हे नेते पोहोचल्यावर त्यांना दोनवेळा अटक झाली. मग सोडून देण्यात आलं, तेव्हा दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील परतत असताना निपाणीजवळ सत्याग्रह सुरू असल्याचं दिसलं, तर त्यांनी त्यात सहभाग घेतला.यावेळी मात्र दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी सोडलं नाही. त्यांना एका वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ही शिक्षाही भोगली. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही 1962, 1967, 1972 आणि 1980 अशावेळी आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. पुढेही सीमाभागातील मराठीजनांवरील अन्यायाविरोधात प्रा. एन. डी. पाटलांच्या खांद्याला खांदा लावून दि. बा. पाटलांनी विधानसभेत आवाज उठवला. लोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबांची राजकीय कारकीर्द पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार अशी राहिली. दोनवेळा ते लोकसभा पराभूतही झाले. त्यातला जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे 1999 सालचा.16 ऑगस्ट 1999 रोजी दि. बा. पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. चार दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत राहिलेल्या आणि निधर्मी राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेल्या दि.बा. पाटलांच्या या प्रवेशाचा अनेकांना धक्का बसला होता. शिवसेनेतून लढवलेली लोकसभा पराभूत झाल्यानंतर ते राजकारणातून बाहेर पडून सामाजिक आंदोलनांशी त्यांनी संबंध जोडला. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम राहिले. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत दि. बा. पाटील सक्रिय राहिले. 24 जून 2013 मध्ये दि. बा. पाटलांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला.

1957 च्या सुमारास ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं, त्यावेळी पनवेल, अलिबाग भागातून दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सीमेवर हे नेते पोहोचल्यावर त्यांना दोनवेळा अटक झाली. मग सोडून देण्यात आलं, तेव्हा दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील परतत असताना निपाणीजवळ सत्याग्रह सुरू असल्याचं दिसलं, तर त्यांनी त्यात सहभाग घेतला.

यावेळी मात्र दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी सोडलं नाही. त्यांना एका वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ही शिक्षाही भोगली. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही 1962, 1967, 1972 आणि 1980 अशावेळी आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. पुढेही सीमाभागातील मराठीजनांवरील अन्यायाविरोधात प्रा. एन. डी. पाटलांच्या खांद्याला खांदा लावून दि. बा. पाटलांनी विधानसभेत आवाज उठवला. लोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबांची राजकीय कारकीर्द पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार अशी राहिली. दोनवेळा ते लोकसभा पराभूतही झाले. त्यातला जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे 1999 सालचा.16 ऑगस्ट 1999 रोजी दि. बा. पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. चार दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत राहिलेल्या आणि निधर्मी राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेल्या दि.बा. पाटलांच्या या प्रवेशाचा अनेकांना धक्का बसला होता.
शिवसेनेतून लढवलेली लोकसभा पराभूत झाल्यानंतर ते राजकारणातून बाहेर पडून सामाजिक आंदोलनांशी त्यांनी संबंध जोडला. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम राहिले. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत दि. बा. पाटील सक्रिय राहिले. 24 जून 2013 मध्ये दि. बा. पाटलांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!