राजकीय

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६

मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ ‘या’ महत्त्वाच्या तारखा आणि नियमांची घ्या नोंद!

भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम २०२६ ची घोषणा केली आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात ३० जून २०२६ पासून होत असून, याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे कार्यक्रम तारीख
अर्हता दिनांक १ ऑक्टोबर २०२६, तयारी, प्रशिक्षण व छपाई कालावधी – २० जून ते २९ जून २०२६, BLO मार्फत घरोघरी भेटी – ३० जून ते २९ जुलै २०२६, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण – २९ जुलै २०२६, प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी – ५ ऑगस्ट २०२६, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी – ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६, दावे व हरकतींचा निपटारा – ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६, अंतिम मतदार यादी प्रसिद्धी – ७ ऑक्टोबर २०२६, मतदारांनी काय करावे?

● मागील मतदार यादीत स्वतःचे व कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासावे.
● घोषणापत्रातील माहिती अचूक भरावी.
● संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क ठेवावा.
● तपशीलांमध्ये विसंगती आढळल्यास निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांकडून नोटीस प्राप्त होऊ शकते.

नोटीस मिळाल्यास आवश्यक कागदपत्रे

मतदारांनी स्वतःची जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक स्व-प्रमाणित कागदपत्र सादर करावे:

जन्म प्रमाणपत्र
पासपोर्ट
शैक्षणिक प्रमाणपत्र (मॅट्रिक/विद्यापीठ)
कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST)
वनहक्क प्रमाणपत्र
शासन, बँक, टपाल विभाग, LIC किंवा PSU यांचे ओळखपत्र
निवृत्तीवेतन आदेश (PPO)
कौटुंबिक नोंदवही
जमीन किंवा घर वाटप प्रमाणपत्र
NRC (जेथे लागू असेल तेथे)
महत्त्वाची सूचना

१ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी तसेच भारताबाहेर जन्मलेल्या किंवा नागरिकीकरणाद्वारे नागरिकत्व प्राप्त केलेल्या व्यक्तींना नियमानुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार नोंदणी अधिकारी
२६३ – दापोली

डॉ. विजयकुमार सूर्यवंशी
उपविभागीय अधिकारी, दापोली
दूरध्वनी: ०२३५८-२८२०३१ / ८८०६६९२३८३

२६४ – गुहागर

वैशाली पाटील
उपविभागीय अधिकारी, खेड
दूरध्वनी: ०२३५२-२६४८४८ / ९०११२३४२९९

२६५ – चिपळूण

आकाश लिगाडे
उपविभागीय अधिकारी, चिपळूण
दूरध्वनी: ०२३५५-२५५०४६ / ९७३०४४४५४०

२६६ – रत्नागिरी

जीवन देसाई
उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी
दूरध्वनी: ०२३५२-२२२४२२ / ७४२३९९९९९९

२६७ – राजापूर

विश्वजीत गाताडे
उपविभागीय अधिकारी, राजापूर
दूरध्वनी: ०२३५३-२३२५१९ / ७७७६८१७९१६

लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपले नाव मतदार यादीत अचूकरीत्या नोंदले जाईल याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

— प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!