महाराष्ट्र

काल्हेर येथे पीडित कुटुंबाला घराचा ताबा मिळवून देण्यात यश

आम्ही भारतीय/साप्ताहिक, हिमांशू पाटील

ठाणे विभागातील काल्हेर येथे एका खाजगी वित्तीय संस्थेने (मोतीलाल ओसवाल) थकीत कर्जाच्या कारणास्तव न्यायालयातून थर्ड पार्टी ऑर्डर मिळवून संबंधित व्यक्तीचे राहते घर सील केले होते. या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी बहुजन समाज पक्ष आणि जनता सरकार मोर्चा यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पुढाकार घेण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी उपस्थित राहून पीडित व्यक्तीस त्यांच्या घराचा ताबा पुन्हा मिळवून दिला. यावेळी घराला लावलेले कुलूप तोडून संबंधित कुटुंबास घरात प्रवेश करून देण्यात आला. सदर प्रसंगी ताबा दिल्यानंतर संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.दत्तात्रय कानडे, अनिल वर्मा, दिलीपराव माळी,प्रविण एस. के. पवार, तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पीडित नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!