श्रावणातला पहिला आणि महत्त्वाचा सण: नागपंचमी
नागपंचमी सर्पदेवतेकडून समृद्धी, संरक्षण आणि फलनशीलतेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरी केली जाते

श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली करतात.
“भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो”, हेही उपवास करणयामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा.. सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..
तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, नखे- केस कापू नयेत, केस विंचरू नयेत, अन्यथा नागोबाला दुखापत होईल… वगैरे संकेत पाळले जातात.
तिसरी कथा अशी सांगतात, एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला, अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ किंवा ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते. मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत-
“वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥”
— पवित्र भविष्योत्तर पुराण : ३२-२-७.)
नागपंचमीचा उगम: नागपंचमी हा पारंपरिक हिंदू सण आहे, जो नागांना देवतांच्या रूपात सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो. हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी (जुलै-ऑगस्टमध्ये) साजरा केला जातो. या सणाचे मूळ प्राचीन हिंदू पुराणकथा आणि कृषी परंपरांमध्ये आहे. सर्पपूजा ही निसर्ग आणि त्यातील घटकांवरील श्रद्धेतून उद्भवली आहे, ज्यामध्ये सापांना पीकांचे रक्षक व फलनशीलतेचे प्रतीक मानले जाते, म्हणून आपला बळिराजा त्याला आपला मित्र मानतो. नागपंचमी हिंदू धर्मग्रंथांशी जोडलेली आहे, ज्यामध्ये रामायण, महाभारत, वेद, शास्त्रे आणि पुराणे यांचा समावेश आहे. पुराणकथांनुसार नागदेवता भगवान शिवाशी संबंधित आहेत. भगवान शंकर नेहमी त्यांच्या गळ्यात नाग धारण केलेल्या रूपात दिसतात, ज्यामुळे मृत्यू आणि जीवनचक्रावर त्यांचे प्रभुत्व दर्शविले जाते. आणखी एक लोकप्रिय कथा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे, ज्यांनी यमुना नदीतील कालिय नागाला पराभूत करून चांगल्याचा वाईटावर विजय दर्शविला.
सर्पदेवतांची पूजा खजिना आणि जलाशयांच्या रक्षणाशीही संबंधित आहे. महाराष्ट्रात नागपंचमीला विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, जिथे या सणात पुराणकथा, लोककथा आणि पर्यावरणीय जाणीव यांचा समन्वय दिसून येतो. नागपंचमी का साजरी केली जाते? तर नागपंचमी सर्पदेवतेकडून समृद्धी, संरक्षण आणि फलनशीलतेसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी साजरी केली जाते. हा सण सापांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे, जे पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या सणाद्वारे सर्पदंश आणि अनिष्ट घटनांपासून संरक्षण मिळते, असा विश्वास आहे. ग्रामीण महाराष्ट्रात, जिथे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे, नागपंचमीचे विशेष महत्त्व आहे. सापांना पिकांचे रक्षक मानले जाते. या सणात निसर्गाशी सुसंवाद आणि सर्व सजीवांप्रती आदर यावर भर देणारे विधी केले जातात. मानवमात्रांसह सरपटणारे प्राणी, सर्व जीवजंतू यासर्वांमध्ये एकच प्रकारची आत्मा नावाची दैवीशक्ती वास करत असते की जी परमात्म्याचा अंश आहे, असे आध्यात्मिक ज्ञानात सांगितले जाते. विविध समाज माध्यमांवरुन सविनय साभार जी !
॥॥ समस्त भारतीय बांधवाना नाग पंचमी सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी ॥॥
- संकलन व सुलेखन -
श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.
(एक शेतकरीपुत्र)
राह. श्रीगुरूदेव प्रार्थनामंदिर जवळ, रामनगर वॉर्ड, गडचिरोली.
फक्त मधुभाष- 9699836717.



