सातवाहनकालीन शेती मशागतीदरम्यान दोन हजार वर्षांपूर्वीच्या पाऊल खुणा उजेडात
मानमोडी लेणी समूहात कोरलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू राहत असत.

आम्ही भारतीय / डिजिटल, पुणे जुन्नर पिंपळवंडी शहराच्या पूर्वेला सुरुवात येथे शेतीच्या मशागतीच्या दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांना सुमारे 2200 वर्षांपूर्वी चे सातवाहनकालीन अवशेष सापडले आहेत. तिथे घराची कौले भाजलेल्या मातीचे विविध रंगी मणी आणि समुद्र शंखांच्या बांगड्यांचे तुकडे सापडले असल्याची माहिती जुन्नरच्या प्राचीन इतिहास अभ्यासक बापूजी ताम्हणे यांनी दिली. कित्येक महिन्यांपासून बापूजी ताम्हणकर पुण्याच्या जुन्नर परिसरात प्राचीन पाऊलखुणांचा अभ्यास करत आहेत. त्यांना या अभ्यास दौऱ्या दरम्यान सुसरबाग येथे सदर अवशेष सापडले. सखोल अभ्यासानंतर ताम्हणे यांना हे अवशेष सातवाहन कालीन असल्याची खात्री पटली आहे.
सातवाहन काळात कुकडी नदीच्या काठावर असलेल्या मातेच्या टेकडीवर एक मोठी मानवी वस्ती असल्याचे ताम्हणे यांचे मत आहे. या संशोधनामुळे सातवाहन कालीन कला संस्कृती आणि लोकांच्या जीवनशैलीवर नव्याने प्रकाश पडणार आहे. सापडलेल्या अवशेषांवरून अभ्यासांती असे दिसून येते की, येथील लोकांना मणी आणि दागिने बनविण्याचे प्रगत तंत्रज्ञान अवगत होते. येथे तयार होणाऱ्या वस्तू, दागिने जुन्नरच्या बाजारपेठेतून प्रतवारी मार्गे कल्याण व भडोच बंदरातून पाश्चिमात्य देशात निर्यात केला जात असे. मण्यांसोबत या ठिकाणी फुटलेली भांडी, विटा, धान्य दळण्याचे जाते आणि पाटे – वरवंटे देखील सापडले आहेत. सुपारीच्या आकाराचे आकर्षक मणी सुसरबाग येथे सापडले आहेत. यातील काही म्हणी सुपारी सुपारीच्या आकाराएवढे मोठे असून ते साच्याशिवाय हाताने चाकावर घडवलेले असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. काही मण्यांवर गोलाकार भागावर पांढऱ्या रंगाच्या रेषांची ठळक पट्टी दिसून येते. माळेत व्यवस्थित विणता यावे यासाठी माण्यांना आरपार चित्रे पडलेले आहेत. हे सातकालीन कारागिरीचे उत्तम उदाहरण आहे. सातवाहन काळात स्त्री आणि पुरुष दोघेही अलंकार म्हणून अशा मण्यांच्या माळा वापरत असत. मानमोडी लेणी समूहात कोरलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खू राहत असत. सातवाहन काळातील लोकवस्ती जुन्नर जवळील सुरबाग, आगरगाव, दिल्ली पेट येथील कुकडी नदीच्या काठावरील पांढऱ्या मातीच्या टेकडीच्या ठिकाणी होती. त्याची पुरावे देखील अभ्यासकांना मिळाले आहेत. हे मणी सातवाहन काळातील असून पुरतत्व विभागाने पुन्हा एकदा जुन्नर मध्ये उत्खनन करणे गरजेचे आहे.
– अरुणा वाघोले, इतिहास विभाग प्रमुख, आळे महाविद्यालय जुन्नर

