अग्रलेख

हिन्दूकुश = बौद्धांची कत्तलहिन्दू या नावाने धर्म कधी अस्तित्वात आला ?

इ.स. पू. ६ व्या शतकाचे सुमाराला पर्शियन लोकांनी सिंधू नदीच्या पूर्वेकडील छोटासा भूभाग जिंकला होता. तिथल्या ज्या लोकांना त्यानी पराभूत केले, त्याना ते हिन्दु म्हणत. पर्शियन भाषेत गुलाम हा शब्द नाही. गुलामी हा अर्थ व्यक्त करणारा त्यांच्या भाषेतील शब्द म्हणजे हिन्दु । (गुलाम हा अरेबिअन शब्द आहे) पुढे लवकरच इस्लामी आक्रमणाखाली पर्शियन साम्राज्य नष्ट झाले. केवळ साम्राज्यच नष्ट झाले असे नाही तर तिथल्या पारशी लोकांचे इस्लामी करण झाले. जरी धर्म बदलला तरी त्यांची भाषा बदलली नाही. अरब व पर्शियन यांचा आता एकच धर्म बनला. तो म्हणजे इस्लाम. या इस्लामने इ.स. ७२२ नंतर जेव्हा भारतावर आक्रमणे करावयाला सुरुवात केली, तेव्हा ज्या भागावर ते विजय मिळवित त्या भागातील भारतीयांना हिन्दु म्हणजे गुलाम म्हणत. इथं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या काळात इ. सनाच्या सातव्या-आठव्या-नवव्या शतकात अफगाणसह भारतीय उपखंडात बौद्धानुयायी लोक होते. अफगाणात बौद्धाचे केवढे वर्चस्व होते याची प्रचिती तेथील अजस्त्र बुद्ध मूर्ती अद्याप देत आहेत. अफगाण पाकिस्तान सीमेवर हिन्दुकुश नामक पर्वत आहे. हिन्दु-कुश म्हणजे हिन्दुची कत्तल ज्या पर्वतावर हिन्दुंची कत्तल करण्यात आली त्या पर्वतांचे नांव मुस्लीमांनी हिन्दुकुश असे ठेवले. ज्यांची कत्तल करण्यात आली ते लोक सध्या सारखे हिन्दू नव्हते तर बौद्ध पंथीय होते. अटक नदीचे उल्लंघन करु नये असा कायदा ब्राह्मणांनी सातव्या शतकाच्या दरम्यान करुन सिंधू नदीच्या पूर्वेकडील काही भागावर वर्णभेदी ब्राह्मण धर्माचे प्रभुत्व लादले होते. त्यामुळे भारताचा अफगाण वगैरेशी संपर्क तुटला होता. याचा फायदा इस्लामी आक्रमकांनी उठवून भारतापासून अलग पडलेल्या काबूल-कंदाहार (अफगाण) येथील जनतेची अमानुष कत्तले केली ही बौद्धाची होती. या बौद्धांनाच कत्तलकर्त्या मुस्लिमांनी हिन्दू म्हणून संबोधिले. त्या नंतरही सिंधू पार करुन मुस्लिम आक्रमक जेव्हा भारतात येऊन इथली राज्ये बळकावीत तेव्हा बौद्धपंथीय काय किंवा ब्राह्मण पंथीय काय कुठलीही राजवट असली तरी तिला हिन्दु राजवट मानून प्रजा जनांना हिन्दू म्हणत. हिन्दुकुश हे बौद्धांच्या कत्तलीवरुन पडलेले नांव आहे. जर कुणाला हिन्दू या नांवाचा गर्व बाळगायचा असेल तर त्याने असे समजू नये की, बौद्ध हे हिन्दू नाहीत. परकीयांच्या अन् मुख्यतः मुस्लिमांच्या दृष्टीने बौद्ध हेच पहिले हिन्दू ठरतात. पण हिन्दू हा शब्द गर्वाने स्वीकारावयाच्या अर्थाचा नाही. त्याचे अनेक अर्थ आहेत. त्यातील एक अपवाद वगळता बाकी सगळे अर्थ गलिच्छ आहेत. इथं संकल्प मंत्राचे मराठी भाषांतर दिले आहे. त्या विषयीची चर्चा पुढील भागात केली आहे. पण त्यामधील सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्यातील बौद्ध अवताराचा उल्लेख । मूळ संदर्भ असा आहे, “….दंडाकरण्य देशे, जंबू द्वीपे, भारत वर्षे, भरत खंडे गोदावर्याम् दक्षीण तीरे (अथवा रेवायाः उत्तरे तिरे) बौध्दावतारे, रामक्षेत्रे… वगैरे ” आता बुद्ध म्हणजे कुणी परधर्मी होता असा समज करुन देण्याची साथ पसरली आहे, पण हा संकल्प मंत्र बनवला गेला तेव्हा बुद्धाला परकीय मानले जात नव्हते. उलट तो दहा अवतारातील एक अवतार मानला जात होता. व त्याच्या अवतार कृत्याचा प्रभाव ज्या काळात प्रकर्षाने जाणवत होता असा काळ सदर संकल्प मत्र तयार करते वेळी होता. जो बुद्ध परधर्मी असल्याचा प्रचार अलीकडे केला जातो त्या बुद्धाचे नाव घेतल्या शिवाय धार्मिक कार्याला प्रारंभ केला जात नसे. सध्या अशी मखलाशी करण्यात येते की संकल्प मंत्रातून हा ‘बौद्धावतारे’ शब्द प्रयोग वगळण्यात येतो. कारण आता ब्राह्मण बुद्धाच्या पूर्णपणे विरोधी गेले आहेत. अन् धर्माची सगळी माहिती ब्राह्मणांनाच असते असा आमचा समज असल्यामुळे ते जो काय गोंधळ घालतील तो निमूटपणे बघण्यापलीकडे आपण काही करत नाही. महामहोपाध्याय पा. वा. काणे (भारतरत्न) यांनी धर्मशास्त्राचा इतिहास हा ग्रंथ लिहिला आहे. त्यात काणे म्हणतात की “ब्राह्मणी धर्माने बौद्धाचा पराभव केला असं म्हणणं सत्याला धरुन नाही. उलट ब्राह्मणी धर्म बुद्धापुढे झुकला, त्याला विष्णुचा नववा अवतार मानून आपल्या देवता परिवारात समाविष्ट केला.” जर ब्राह्मणी धनि बुद्धाला आपल्या देवता परिवारात समाविष्ट करुन घेतले नसते, तर या देशातील ब्राह्मणांना आज जन्मजात श्रेष्ठत्व सांगून स्वतःचे उच्चत्व मिरविण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती दिसली नसती. मूलनिवासी व आर्यब्राह्मण अशा विभागणीत भारतीय समाज दिसला असता. सध्या हिन्दू म्हणून बौध्दांपेक्षा आपण वेगळे आहोत असा समज (ब्राह्मण व शिक्षण खाते यांच्या संगनमताने) जो हिन्दू म्हणवून घेणारात पसरला आहे त्यांनी हा संकल्प मंत्र पहावा. अन् मग बौध्दांपेक्षा आपण वेगळे असल्याची भाषा करावी. हा संकल्प मंत्र स्पष्टच सांगतो की, या संकल्प मंत्रानुसार वेदोक्तापासून – स्मृती-पुराणोक्त मंत्रानुसार जी जी म्हणून देवताविषयक कर्मकांडे करणारे आहेत त्या सर्वांनी बुद्धाच्या धम्माचा अवलंब केलेला आहे.” यामध्ये हिन्दूत्वाचं कुठे नाव निशाण सुद्धा नाही. इ.सनाच्या ७ व्या आठव्या शतकात अफगाण मध्ये बौद्धांनाच हिन्दू म्हटले आहे. तर सिंध मध्ये ब्राह्मण हा वेगळा पंथ असल्याचे मानले जाई. हिन्दू, वैदिक या सारख्या कुठल्या नावाचा धर्म अथवा पथ तेव्हा अस्तित्वात नसल्यामुळे त्याप्रमाणे उल्लेख करण्याची तत्कालीनांना गरज भासली नाही.संकल्प मत्रांचे मराठी भाषांतर महाभाग्यशाली व पुरुषश्रेष्ठ सर्वव्यापी विष्णु आज्ञेने वर्तमान काळी आदिब्रह्माच्या दुसऱ्या परार्धात, विष्णु पादात, श्री श्वेतवराह कल्पात, वैवस्वतमन्तराचे २८ व्या युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणांत जम्बू द्वीपातील भारत वर्षात, दंडकारण्यात, गोदावरीच्या (किंवा रेवा नदीच्या) उत्तरेकडील (अथवा दक्षिणेकडील) तीरास बौद्ध अवतारात रामक्षेत्रात, शालीवाहन शकाच्या – (अमुक) सवत्सरात आयनात (उतरायण- अथवा दक्षिणायन) अमुक (वसंत, ग्रीष्म वगैरे) ऋतूत अमुक (चैत्र, वैशाख वगैरे) मासात अमुक (शुक्ल, अथवा कृष्ण) पक्षात, अमुक (प्रतिपदे-पासून अमावस्ये पर्यंतची तिथी) तिथीला. अमुक वारी (सोम, मंगळ वगैरे) अमुक नक्षत्री (अश्वीनी भरणी वगैरे) योग (विष्कंभ, प्रति वगैरे) शुभनाम करणात (बलव, बव वगैरे) (मेष वृषभ वगैरे) राशीत चंद्र स्थित असता – – (मेष वगैरे) राशीत देवगुरु – – (मेष वगैरे राशीत) सूर्यस्थित असता बृहस्पती स्थित असता आणि इतर ग्रह आपापल्या राशीवर स्थित असता, अशा विशेष गुणानी श्रेष्ठ झालेल्या कल्याणकारक व पुण्य कारक अशा मला (ब्राह्मण असेल तर वेदोक्त) शूद्र अथवा ब्राह्मणेत्तर असेल तर पुराणोक्त फलप्राप्ती होण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या परिवारास गायी वगैरे चार पायांच्या पशु व दोन पायाचे (मनुष्य अथवा कोंबड्या सारखे पक्षी) प्राणी यांच्यासह आमच्या कुटुंबियांना क्षेम स्थिरस्थावरता, दीर्घायुषता, आरोग्य, ऐश्वर्य इत्यादिकांची वाढ होण्यासाठी व समस्त मंगल प्राप्तीसाठी तसेच सर्वत्र उक्तर्ष होण्यासाठी अमुक देवता प्रसन्न व्हावी म्हणून यथा शक्ती मिळालेल्या पूजा साहित्याने मी ध्यान आवाहनादि सोळा उपचारांनी…. गोत्रातील मी…. पुजेला प्रारंभ करीत आहे. कोणतेही पुजा कर्म करण्यापूर्वी म्हणावयाचा हा संकल्प मंत्र आहे. लग्न, श्राध्द वगैरेचा संकल्प सोडताना सुद्धा बौध्दावताराचा उल्लेख आहे. व्हिक्टोरिया राणीने जेव्हा १ नोव्हेबर १८५८ रोजी जाहीरनामा काढला त्यावेळी मुस्लिम धर्मीय” असा शब्द प्रयोग वापरला त्यात काही गैर नव्हते. कारण मुस्लिम (इस्लाम) या शब्दाचा स्वीकार त्याच्या पूर्वजानी अनेक शतके अगोदरच केलेला होता. परंतु सध्या जे हिन्दु म्हणून ओळखले जातात त्यांच्या पैकी एकाच्याही पूर्वजाने भूतकाळात हिन्दु शब्दाचा स्वीकार केलेला नव्हता. परंतु ब्रिटिश राजकन्यौना मुस्लिम धमपिक्षा वेगळ्या धर्माचे असलेल्या लोकांना कुठलं तरी धर्मवाचक नाव देण्याची गरज भासू लागली म्हणून जे नांव परर्शियन-अरब लोकांनी इथल्या समाजासाठी रुढ़ केलं होतं, अन् ज्या समाजातील सर्वच जाती गोमांस निषिद्ध मानतात असा इंग्रजाचा समज होता अशा समाजासाठी १/११/१८५८ च्या जाहीर नाम्यात हिन्दु धर्मीय हा शब्द नोंदण्यात आला हिन्दुधर्म हा शब्द कुठल्या भारतीय राजाने राजमान्य केलेला नाही तर तो परकीय इंग्रज राजकर्त्यांनी राजमान्य केला. अन् आपण तो मानला इंग्रजांनी मुंबईचे बाँबे केलं. मराठी अस्मितेच्या कारणास्तव बाँबे शब्द रद्द करण्यात आला. तसा हिन्दू हा मुस्लिम इंग्रजानी आम्हाला दिलेला शब्द आमचे धर्मवेत्ते का झुगारुन देत नाहीत ? १८५८ पर्यंत विद्य पर्वताच्या दक्षिणेकडील भारतीयांना हिन्दू म्हणत नसत. विंद्य पर्वताच्या उत्तरेकडील लोकांना हिन्दू म्हणत. पण ते धर्मवाचक अर्थाने नव्हे. भारतात प्रथम उत्तरेत इस्लामी राजवटी प्रस्थापित झाल्या होत्या. तेव्हा मुस्लिम व भारतीय यांच्यातील वेगळेपणा व्यक्त करण्यासाठी मुस्लिमानी उत्तर भारतीयासाठी हिन्दू हा शब्द वापरला. तोच शब्द पेशवाईच्या काळा पर्यंत उत्तर भारतीयांसाठी दक्षिण भारनीय लोक वापरत असत ही गोष्ट सध्या फारच थोड्या लोकांना माहिती आहे. तसेच मराठी माणसे, कानडी लोक, तेलगू, केरली, तामीळ वगैरे दक्षित्याना हिन्दू म्हणण्यात येत नसे. जेव्हा पेशव्यांची मोहीम बिंद्य पर्वताच्या उत्तरेकडे जाई तेव्हा ‘हिन्दुस्थानावर मोहीम’ काढली अस म्हणत असत. दि.१-११-१८५८ च्या राणीच्या सत्तेने पाकिस्तान पूर्व भारतात ‘हिन्दू’ हा शब्द मुस्लिमेत्तर (अर्थात ख्रिश्चनानंतर सुध्दा) समाजासाठी राज आज्ञेने वापरण्यात येऊ लागला. त्यावेळी आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती म्हणून त्या शब्दाचा आपण स्वीकार केला, असं मानलं तरी आता स्वतंत्र झाल्यावर सुद्धा गुलामगिरीत आमच्या गळ्यात अडकवलेले… ‘हिन्दुत्व’ आम्ही सोडायला तयार नाहीत. इतकी आमच्या अंगात गुलामगिरी मुरली आहे. एकेकाळी भारतातील एक दोन लक्ष लोकच या हिन्दुत्वाच्या गुलामगिरीत होते आता सर्व मूलनिवासी लोक ब्राह्मणाच्या गलपाणि गहेत ते ब्राह्मण, आम्ही शूद्र-हिन्दू ।। धर्म, वर्ण, जात यांचा संकल्प मंत्रात उल्लेख नाही. नुकतेच संकल्प मंत्राचे भाषांतर दिले. त्यात सृष्टीच्या उत्पत्तीक्षणापासून तो सदर धार्मिक विधी करण्याच्या काळापर्यंत कोणते कल्प, कोणता मनु, कोणते युग, त्या युगातील कोणते वर्ष यापासून तिथी, पक्ष, वार, आयन, वगैरेचा उचार करण्यास सांगितले आहे नंतर ज्या स्थळी सदर कृत्य केले जावयाचे त्या स्थळाचा उल्लेख निर्देश करण्यासाठी जम्बू द्वीप, भरत वर्षे, भारत खंडे, गोदावर्या दक्षिण तीरे, दंडकारण्ये वगैरेचा उच्चार करावयाला सांगितले आहे. अन् नंतर जी व्यक्ती (पुरुष) सदर कृत्य करते, त्याच्या गोत्राचा उच्चार करुन पुढे मग त्याचा पणजा, आजा, बाप व कृत्यकर्ता यापैकी आवश्यकतेनुसार कुणा-कुणाचे उल्लेख करण्यास सांगितले आहेत. परंतु ज्या चार वर्णाचा डंका पिटला जातो, त्यांचा उल्लेख या संकल्प मत्रात नाही. तसेच कुठल्याही जातीचा उल्लेख नाही. व धर्माचाही नाही. चार वर्ण व त्या वर्ण संकरातून निर्माण झालेल्या हजारो जाती यांचा समुदाय म्हणजे हिन्दू धर्म अस सरकारी माध्यमातून सुद्धा सागण्यात येते. अन् ब्राह्मण पंडीताकडून सुद्धा सांगण्यात येते. असं असताना संकल्प मंत्रात स्थळकाळ याच्या जाडीने धर्म, वर्ण व जात यांचा उच्चार करण्यास सांगणारे विधान हवे होते. (उदा. मी हिन्दू अथवा वैदिक धर्मातील xxx (क्षत्रिय वगैरे) वर्णातील xxx जातीत (मराठा, कुणबी वगैरे) xxx गोत्रात (काश्यप, भारद्वाज वगैरे) xx पित्याचे पोटी जन्मास आलेला xxx नामक व्यक्ती सदर धर्मकार्य करत आहे. असं संकल्प मंत्रात हवं होतं. पण संकल्प मंत्रात फक्त गोत्राचा उल्लेख आहे. वर्ण, जात व धर्म यांचा उल्लेख नाही. गोत्र, गोठा, गोकूल, गोत्र याच स्पष्टीकरण करताना सागितल आहे की, ज्या काळी भटके जीवन जगणारी सस्कृती होती त्या वेळी अस भटके जीवन जगणारे लोक टोळ्या करुन रहात पुराणे व वेद यावरुन दिसून येते की वेद संस्कृतीचे लोक आपल्या टोळ्यांना गोत्र म्हणत. व त्या गोत्रांचा जो प्रमुख त्याच्या नावांने ते गोत्र ओळखले जावयाचे. पुढे जो पहिला गोत्र प्रमुख म्हणून मानण्यात आला, त्याच्या पश्चात गोत्र प्रमुखाच्या पदावर येणारी व्यक्ती ही पहिल्या गोत्रकर्त्याच्याच नांवाने ओळखण्याची वहिवाट पडली. म्हणून वसिष्ठ, अमी कश्यप अशा असंख्य नावाच्या व्यक्ती वेगवेगळ्या राजघराण्यातील अनेक पिढ्यांत वावरताना दिसतात. वस्तुतः तो मूल गोत्रकर्ता नसतो तर त्या पदावर आरुढ झालेला दहाव्या किंवा विसाव्या किंवा तिसाव्या पिढीतील माणूस असतो व राजाचा पुरोहित कम् राजगुरु म्हणून काम करतो. सिंधू परिसरापर्यंत ही गोत्र कल्पना प्रबळ होती. (फक्त आर्यामध्ये) गंगा-यमुना प्रदेशात गोत्र कल्पना नव्हती. तिथं गोकुळ (गो-कुळ) संस्कृती होती. ही मूल निवासी लोकांची जीवन पद्धती. श्रीकृष्ण पिता वसूदेव व कृष्णाचा पालनकर्ता नंद हे दोघे सम वयस्क. पण नंद हा भटक्या गोप अथवा गोकुळ संस्कृतीचा होता. याच संस्कृतीमधील सुधारलेले लोक म्हणजे उग्रसेन कंस, वसुदेव वगैरे लोक. एकाच वेळी स्थिर व भटक्या वसाहती नांदत असण्याचा तो काळ (कृष्णाच्या वेळचा). चंद्रगुप्त मौर्याच्या वेळी सुद्धा स्थिर वसाहती व भटक्या वसाहती असे दोन्ही प्रकारचे समाज जीवन जगणारे लोक अस्तित्वात होते असे मॅगेस्थिनिस याने लिहून ठेवले आहे. जेव्हा बहुतांश मूलनिवासी लोकांनी भटक्या जीवनाचा त्याग करुन स्थिर वसाहत संस्कृतीचा अवलंब केला तेव्हा त्यांना आपली ओळख पटवून देण्यासाठी गोकुळ या संज्ञेची काही गरज राहिली नाही. अशी गरज त्यांना जेव्हा होती की त्यांना गाव-वाडी वगैरे काही नव्हते. भटके जीवन जगणाऱ्या एका टोळीतील माणसाना जर दुसऱ्या भटक्या टोळीतील माणसाचा परिचय करुन घ्यायचा असेल तर ते त्यांना तुमचं गोत्र कोणतं अशा अर्थाचा प्रश्न आर्यात विचारला जाई व मूलनिवासी लोक असं विचारीत की तुझे गाकुळ कोणते. काळाच्या ओघात आर्यानी देखील स्थिर वसाहतवादाचा स्वीकार केला व मूलनिवासी लोकांनी देखील केला मग ज्या ठिकाणी वसाहती केल्या जात त्यांना ग्राम असं अभिधान देण्यात आले ग्राम हा शब्द अस्तित्वात आल्यावर टोळीवाचक गोकुळ किंवा गोत्र या शब्दाची गरज राहिली नाही म्हणून अमुक व्यक्ती कोणत्या गोकुळाची अथवा गोत्राची असं विचारण्याऐवजी अमुक मनुष्य कोणत्या गांवचा असं विचारण्याचा प्रघात सुरु झाला. पण आर्य कसले निगरगट्ट । ते आपल्या अक्षर शत्रुत्वाला जिथं गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याप्रमाणे चिकटून राहिले, तसेच आपल्या गोत्राला चिकटून राहिले, जरी ते गांव-वसाहत करुन राहिले. तरी धर्म विषयक कर्मकांड करताना स्थळाचा उल्लेख टाळून गोत्रांचा उल्लेखच करु लागले. मूलनिवासी लोकांनी मात्र कालबाह्य ठरलेल्या ‘गोकुळाचा उल्लेख आपल्या धर्मकृत्यात येऊ दिला नाही. गोत्रचा अर्थ गोठा. इ.स. पूर्व दुसऱ्या शतकानतर आर्यांनी या देशावर वर्चस्व गाजविण्यास सुरुवात केली. वर्चस्व गाजविण्यासाठी त्यांनी पहिला हमला केला तो जबरदस्त होता. (मौर्य साम्राज्य खालसा करणे) पण १६० वर्षांनी सातवाहन राजानी ब्राह्मणांवर डाव उलटला व त्यांची राजवट नष्ट केली, तेव्हा पासून मोठी सावधगिरी बाळगून ब्राह्मण आर्य इथल्या लोकांवर वर्चस्व गाजविण्याचा मार्ग शोधू लागले. अन् तीन-चारशे वर्षे खटपटी केल्यावर त्यांना तो मार्ग सापडला. हा मार्ग म्हणजे ‘राजगुरुपदाचा । राजापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ असतो व ब्राह्मण सांगेल तसे राजाने ऐकावे असं धर्ममत या काळात पुढे आले. अन् त्या वेळच्या गुप्त राजांनी ते मान्य केले. असं हे मत मान्य करणे म्हणजे आपण मूलनिवासी लोकांचे राजे असलो तरी ब्राह्मणांचे गुलाम झालो ही गोष्ट या गुप्तवंशी राजांच्या डोक्यात शिरली नाही. ते यज्ञयागाच्या देखाव्याला भुलले, यज्ञयाग केल्याने लाभणाऱ्या प्रलोभनाला भुलले व भट सांगतील ते विधी धर्मकृत्य (देवकार्य) म्हणून करु लागले. व त्यांचे अनुकरण प्रजाजन करु लागले. क्रमशः – दिनेश बोधिराज ( संपादक, आम्ही भारतीय सप्ताहिक )

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!