इंदापूर येथे विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न !
कार्यक्रमाला करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संकल्पना संस्थापक सुनिल कदम सर, तसेच दानशूर व्यक्तीमत्व आयु. नंद साळवी व आयु. नथू गवाणे उपस्थित

आम्ही भारतीय / साप्ताहिक,दत्ता ओलंबे : युवा क्रांती संघ (रजि.) करिअर डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम रविवार दि. ७-जून-२०२६ रोजी सकाळी ११.३० ते २ या वेळेत करिअर डेव्हलपमेंट सेंटर, मु. उमरोली, इंदापुर-तळा रोड, ता. माणगांव, जि. रायगड येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईवरुन मुंबई म्युनिसीपल कॅारपॅारेशनच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॅा. सुनिता कदम, मुंबई विद्यापीठाचे विभाग प्रमुख डॅा. मृदुल निळे, जेष्ठ पत्रकार दिवाकर शेजवलकर उपस्थित होते. सदर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक यांनी विद्यार्थ्यांना करियर विषयी उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांपैकी नुकतीच भारतीय सैन्यदलात (Indian Army) निवड झालेला प्रणय सुरेखा पांडूरंग गायकवाड व रायगड पोलिसमध्ये भरती झालेला प्रज्योत पांडूरंग गायकवाड या दोघांनीही आपण कशा प्रकारे मेहनत घेऊन आपली निवड झाली, तसेच युवा क्रांती संघ करिअर डेव्हलपमेंट सेंटरची कसे मार्गदर्शन मिळाले याचे अनुभव मांडले. तसेच १२ वी सायन्स उत्तीर्ण श्रावस्ती प्रेरणा प्रशांत माळी व MSW उत्तीर्ण प्रेरणा पांडुरंग गायकवाड इ. विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचे मनोगत झाल्यानंतर सर्वप्रथम भारतीय सैन्यदलात निवड झालेल्या प्रणय सुरेखा पांडुरंग गायकवाड व रायगड पोलिस मध्ये निवड झालेल्या प्रज्योत सुरेखा पांडुरंग गायकवाड या दोन युवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, त्यानंतर उपस्थित दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे संकल्पना संस्थापक सुनिल कदम सर, तसेच दानशूर व्यक्तीमत्व आयु. नंद साळवी व आयु. नथू गवाणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा क्रांती संघाचे अध्यक्ष संदेश सोनावणे होते तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा क्रांती सेंटरचे कॅार्डिनेटर आयु. प्रशांत शिंदे, कोअर कमिटी सदस्य आयु. सचिन शिंदे, आयु. नितेश कानाडे, प्रेरणा माळी यांनी विशेष प्रयत्न केले. युवा क्रांती संघ संचलित करिअर डेव्हलपमेंट सेंटरचे सर्व कार्यकर्ते, विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
