महाराष्ट्र

दिघी इंडस्ट्रियल सिटी (Dighi Port Industrial Area – DPIA) प्रकल्पामुळे रायगडमध्ये औद्योगिक क्रांती

दिघी इंडस्ट्रियल सिटी (Dighi Port Industrial Area – DPIA) प्रकल्पामुळे रायगडमध्ये औद्योगिक क्रांती होत असून, स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे दालन उघडणार आहे. हा प्रकल्प जलदगतीने पुढे नेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाची (NH-66) थेट जोडणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:विस्तार: रोहा आणि माणगाव तालुक्यातील ९ गावांमध्ये तब्बल २,४५० हेक्टर (अंदाजे ६,००० एकरहून अधिक) क्षेत्रात उभारणी.गुंतवणूक आणि रोजगार: या औद्योगिक हबमध्ये ३८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून १ लाखांहून अधिक स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.

मुंबई-गोवा महामार्ग, दिघी पोर्ट आणि कोकण रेल्वेच्या उत्कृष्ट जाळ्यामुळे मालवाहतूक व दळणवळण जलद आणि सुलभ होईल.या महात्वाकांक्षी प्रकल्पामुळे रायगड जिल्हा केवळ महाराष्ट्राचा औद्योगिक कणाच बनणार नाही, तर तो शाश्वत आर्थिक विकासाचे नवे मॉडेल ठरणार आहे.या प्रकल्पाविषयी या प्रकल्पाविषयी आदिती तटकरे मंत्री महिला व बालविकास यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंट वरून सदर प्रकल्पाची माहिती दिली आहे.

” रायगडच्या औद्योगिक क्रांतीला ‘मुंबई-गोवा महामार्गा’ची गती! रायगडच्या शाश्वत आर्थिक विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. रायगड जिल्हा हा महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीचा मुख्य कणा बनत असून. रोहा आणि माणगाव तालुक्यांतील ९ गावांमध्ये तब्बल २,४५० हेक्टर क्षेत्रात साकारत असलेल्या ‘दिघी इंडस्ट्रियल सिटी’ च्या विकासाला आता अधिक वेग येणार आहे, कारण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता थेट मुंबई-गोवा महामार्गाची जोड मिळणार आहे. तसेच, या नव्या हायवे कनेक्टिव्हिटीमुळे केवळ मोठ्या उद्योगांनाच गती मिळणार नाही, तर या माध्यमातून आपल्या रायगडमधील स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या हजारो नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. “

– आदिती तटकरे मंत्री महिला व बालविकास

त्यांना आलेल्या प्रतिक्रिया देत आहोत

आदिती ताई, नमस्कार

पहिले ताई गोवा महामार्ग पूर्णत्वाकडे घेऊन चला, मग ह्या रस्त्याकडे बघा, ताई वीस वर्षे झाली ह्या गोवा महामार्गाला पण अजून पूर्ण होत नाही. आपली नैतिक जबाबदारी काही आहे की नाही ? गेले चार तप आपण ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताय,सत्ता केंद्र तूमच्या घराण्यापाशी आहे, तुमची जबाबदारी नाही का ? एवढे वर्ष महामार्ग पूर्ण होऊ शकत नाही आणि नुसत्या जाहिराती कसल्या करता ? पहिला हा महामार्ग पूर्ण करा मग जाहिरातबाजी दुसऱ्या मार्गाची करा. विकास करा, दळणवळण कसे सुलभ होईल ते ही पाहिले पाहिजे, परंतु मग दळणवळण सुलभ कसे होईल, आणि महामार्ग कसा लवकरात लवकर होईल हे पण पाहिले पाहिजे, ह्या वर्षी देखील कोकणातील चाकरमान्यांचे कुत्र्याचे हाल होणार आहेत गणेशोत्सवात. कारण रस्ता पूर्ण होऊच शकणार नाही गणपती पर्यंत.

– रमेश निकम

“मुंबई गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार अजून किती लोकांचे बळी जाणार जनतेला किती त्रास सहन करावा लागणार याचे उत्तर द्या.” – अभिषेक मोहिते

“17 र्वष मुंबई गोवा हायवेवर हगवण झालेली पुसा, माणगावची ट्रॅफिक जाम बायपास पूर्ण करा, जय महाराष्ट्र” – नझीम बसीर

“12 वर्ष झाली अगोदर मुंबई गोवा हायवे झाला नाही. रायगड जिल्ह्यामध्ये लागलेली एक भ्रष्टाचारी कीडआहे. सुनील तटकरे साहेब” – दत्ता ओलंबे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!