राष्ट्रीय

खाशाब चित्रपट १ जानेवारी २०२७ ला हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार

महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार

आम्ही भारतीय / दिनेश बोधिराज : चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या ‘खाशाबा’च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता हा टीझर डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. पारंपारिक कुस्तीच्या आखाड्याचे अत्यंत भव्य आणि जिवंत चित्रण यात पाहायला मिळणार आहे. संगीत क्षेत्रातील दिग्गज जोडी अजय-अतुल यांच्या संगीतामुळे टीझरला एक वेगळीच उंची मिळाली असून, संघर्षाची भावनिक तीव्रता आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

1 जानेवारीला उलगडणार भारताच्या पहिल्या ऑलिम्पिक हिरोची गोष्ट मुंबई 3 दिवसांपूर्वीस्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनंतर प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे पुन्हा एकदा एका भव्य कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्सच्या बहुप्रतिक्षित ‘खाशाबा’ चित्रपटाचा दमदार टीझर आज सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, हा महाचित्रपट १ जानेवारी २०२७ रोजी जगभरात प्रदर्शित होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

क्रीडा इतिहासातील सुवर्णपान उलगडणारनव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट एका संघर्षशील कुस्तीपटूची गाथा सांगतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाशाबा दादासाहेब जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कुस्तीत ‘कांस्यपदक’ पटकावले होते. भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेल्या या अभिमानास्पद प्रवासावर हा चित्रपट आधारित असून, प्रादेशिक सिनेमातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रीडापट ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्य अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात, पण तगडी स्टारकास्ट ‘खाशाबा’ यांच्या मुख्य भूमिकेसाठी नागराज मंजुळे यांनी एका नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. मात्र, या नवोदित कलाकाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले असून त्याची घोषणा लवकरच केली जाणार आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकारांची नावे जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम आणि गार्गी कुलकर्णी यांच्या अत्यंत दमदार भूमिका यात असणार आहेत.

१ जानेवारी २०२७ ला सिनेमागृहात धडकणारधुरंधर’, ‘धुरंधर : द रिव्हेंज’ आणि ‘राजा शिवाजी’ यांसारख्या सलग यशस्वी निर्मितीनंतर जिओ स्टुडिओजने हे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२७ ला हा चित्रपट सिनेमागृहात धडकणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी चित्रपटसृष्टीचा डंका चहुबाजूंना गाजवणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणखी एक नवा कोरा सिनेमा घेऊन आपल्या भेटीला येणार आहेत. नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री,सैराट,नाळ यांसारख्या मराठी गावरान चित्रपटांनी देशभरातील लाखो प्रेक्षकांना वेड लावले. अनेक राज्यस्तरीय पुरस्कार देखील या सिनेमांनी पटकावले.कोल्हापूरची लाल मातीमधील कुस्ती ऑलिंपिकमध्ये गाजवून महाराष्ट्रासाठी पहिले वैयक्तिक मेडल जिंकणार्या खाशाबा जाधवांचा प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. खाशाबा जाधव या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला असून या सिनेमात कोणता नवा चेहरा झळकणार याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागली आहे.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!