राष्ट्रीय

तळेकांटे ग्रामस्थांचा १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प; निसर्ग संवर्धनासाठी गाव एकवटले

मुंबई गोवा महामार्गाचे गेली 18 ते 20 वर्ष काम रखडलेले असताना अशा वादामध्ये आज तळेकांटे गावांमध्ये वृक्ष लागवडीचा कार्यक्रम

आम्ही भारतीय डिजिटल /संगमेश्वर (रत्नागिरी) : मुंबई-गोवा महामार्गालगत हरित पट्टा पुन्हा उभा करण्याच्या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील तळेकांटे गावातील ग्रामस्थांनी १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ ते २० वर्षे सुरू असल्याने या कालावधीत परिसरातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामुळे महामार्गालगतचा परिसर ओसाड झाला असून प्रवाशांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी तळेकांटे ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत महामार्गाच्या दुतर्फा 1000 वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, “महामार्गाचा विकास महत्त्वाचा असला तरी पर्यावरणाचा समतोल राखणे आणि परिसराचे नैसर्गिक सौंदर्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विकासासोबत पर्यावरणाची होणारी हानी टाळणे किंवा ती भरून काढण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”

वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गावचे सरपंच सुषमा बणे यांनी सुद्धा संकल्प घेतला आहे. कुणी सरकारने करावा कोणी कॉन्टॅक्टरने करावा याची वाट न पाहता ते करतीलच पण किमान तळेकांठे गावाचा संकल्प वृक्ष लागवडीचा आहे.आज निसर्ग वाचविण्यासाठी गाव एकवटलं. आमचा आदर्श इतर गावही घेतील आणि निसर्ग वाचवतील,असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

पर्यावरण पूरक फणस, चिंच, वड, पिंपळ, आंबा आणि जांभूळ वृक्ष लागवडीमुळे पक्षांचा आदिवास वाढेल. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील याचा आस्वाद घेता यावा यामागचा हा उद्देश असल्याचा ग्रामस्थांनी सांगितले. ही झाड जगवण्याची सुद्धा जबाबदारी इथल्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

विशेष म्हणजे, केवळ वृक्ष लागवड करून न थांबता प्रत्येक झाड जगवण्याची जबाबदारीही ग्रामस्थांनी स्वतः स्वीकारली आहे. “निसर्ग वाचवण्यासाठी आज संपूर्ण गाव एकवटले आहे. आमचा हा आदर्श इतर गावांनीही घ्यावा आणि पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा,” असे ग्रामस्थांनी सांगितले.

या कार्यक्रमास बंडाशेठ साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बणे, शरद कदम, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमी उपस्थित होते.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!