२३२९ व्या सम्राट अशोक जयंतीच्या समस्त मानवतेला मंगलमय सदिच्छा!!
२३२९ व्या सम्राट अशोक जयंतीच्या समस्त मानवतेला मंगलमय सदिच्छा !!

‘देवानंपिय असोक’ देवानंपिय असोक
देवानंपिय अशोकराजा, तू नसतास तर ईथे जन्मलेला आमचा बुद्ध आम्हांला कधी उमगलाच नसता आणि बडव्यानी शेंदूर फासून बंदिस्त केलेल्या बुद्धाला, त्याच्या मुक्तीसाठी; त्यांच्या शतकानुशतके मुजोरीवर, आसवं गाळावी लागली असती, (आर्त मोर्चे आणि धरण धरावी लागली आहेच) पण त्यांनी तर खोट्या काहण्या, रंजक आख्यायिका रचून, खरा इतिहास खोडण्यासाठी आमच्या अनेक पिढ्यांना भ्रमाच्या भोपळ्यात भरकटत ठेवले होते. पण क्षत्रिय प्रियदर्शी अशोक राजा, तू आमचा पहिला मुक्तीदातां राजा आहेस. राजा अशोक,तुझ्या अस्तित्वाने ह्या अफगाणिस्ताना पासून खाली कन्याकुमारी, कर्नाटक पर्यंतचे जंबुद्वीपचंच नाही, तर श्रीलंका, चीन, जपान अशी अनेक राष्ट्र आणि आताचे अगदी अमेरिका आणि संपूर्ण जग; क्रांती, शांती आणि करुणेने नाहून गेले होते. बुद्ध धम्म म्हणजे विज्ञानवाद, चिकित्सक धारणा असलेला मार्ग आणि तो महान वैज्ञानिक मार्ग, मानतेच बीज तू इथल्या जटील भूमीत पुनः नव्यानं रुजवू लागलास. सम्राट राजा, बुद्धा नंतर, तू इथल्या माणसातलं माणूसपण खऱ्या अर्थानं जागृत करत, प्राणी, पक्ष्यांना; मुक्त विहंगम करण्यासाठी मोकळी धरती, आकाश आणि स्व:तंत्र दिलेस. नदी, नाळे स्वच्छ करण्याचे राज-आदेश दिलेस. मानवांचीच न्हवे, तर प्राणी पक्ष्यांची सेवा, सृषुशा करण्यासाठी तू, अनेक करुणामय मनांना हात दिलेस. आणि त्यांना उभारून दिलीस अनेक आरोग्यधाम. व्यापारासाठी रस्ते निर्माण केलेस. रस्त्यांच्या, वाट्यांच्या दुतर्फा, झाडे, औषधी वनस्पती लावण्याची अंमलबजावणी करून, वाटसरूनां; विहिरी, आड, पाणवठे खोदून, तू साचलेल्या माणूसपणला वाहते, मुक्त करून दिलेस. प्रियदर्शी राजा, तू स्तंभ उभारलेस, शिलालेख उभारलेस, तू कलेला मान दिलास, कलेला सन्मान दिलास आणि मूर्त्य कलेत प्राण ओतून अनेक शतका – शतकानां वाचता येईल असा खरा बुद्धाचा इतिहास, जतन करून, दगडातून कोरून ठेवलास राजा. तू नसतास तर बुद्ध आमच्या माथी काल्पनिक देव झाला असता, पण तू, बुद्ध हा माणूस होतो हे आमच्या पर्यंत पोहचवण्यात यशस्वी झालास राजा. तुझ्या ह्या पारदर्शक दूरदृष्टीला काय म्हणावं. चक्रवर्ती राजा,तू स्वतःला प्रमोट न करता जागतिक पटलावर बुद्ध मांडलास, युद्धाचे अनंत दुष्परिणाम संगीतलेस आणि परिवर्तनाचा नवा आदर्श घालून दिलास आणि हा शुद्ध, बुद्ध विचारचं जगाला वाचवू शकतो हे निर्भीडपणे आपल्या मैत्रीपूर्ण आचरणातून ह्या जमबुद्विपाचा (भारताचा) आदर्श सुपुत्र म्हणून ह्या जगाला सांगू लागलास. तरीही माझ्या राजा, तू कोण हा अजूनही प्रश्न आहे? तुझी प्रतिमा पुसली जावी म्हणून उभे राहिले कपोलकल्पित देव, त्यांची मंदिरं अगदी रावणही आणि तुला अनेकांनी दुर्लक्षित केलं. जाणीवपूर्वकचं. तर अनेक इतिहासाकाराणी त्यांच्या कोत्या विचार धारेनं तुला विद्रुप सादर केलं. पण ‘सत्यमेव जयते’, ह्या तुझ्याचं ब्रीद वाक्याने तूं तुझ्या सोनेरी वैचारिकतेने झळाळून दिसलासचं. स्नेही राजा,’बहुजन हिताय बहुजन सुखाय’, म्हणत तू तुझं राज्य निर्माण केलंस आणि हसत मुखाने, जनतेच्या सुखासाठी, सेवसाठी आपला सारा खजिना रिक्त केलास राजा. आपल्या मुलांना , महेंद्र आणि संघमित्रा यांना, बुद्ध धम्माला दान केलेस. महान दानी झालास आणि जागतीक शांतीसाठी तू स्वतः पासून सुरवात केलीस. प्रज्ञावंत राजा, अरे तू एका धर्माचा कसा असू शकतोस, तू तर मानवतेला उजाळा देणारा, प्रत्येक मानवतावादी मानवातला माणूस शोधून देणारा, तू खरा प्रज्ञावंत माणूस आहेस, ह्या देशाला मानव मुक्तीचा, न्यायाचा, आदर्शाचा विचार देणारा तू आहेस !! चक्रवर्ती राजा, ह्या देशांतर्गत सीमा निर्माण करणाऱ्या तू राजा, तू शांतीने बंड मोडून काढलेस, माणसांमाणसालातली दरी मिटवून त्यांना एकसंघ, एक छत्रा खाली आणलेस आणि त्यांना आपलेसे करत अभयदान दिलेस. महान राजा, तुझी आज जयंती…अशोक जन्मोत्सव. माझ्या राज्या, तू जागतिक किर्तीचा एकमेव प्रियदर्शी राजा आहेस हे सांगताना केवढा अभिमान वाटतो. सिकंदर तुझापेक्षा महान असू शकणार नाही हे मी नितीपूर्व कथन करतो. खरं तर तुझ्या उंचीची तुलना कोणाशीही न करता येणारी आहे. जागतिक पटलावर शुद्ध आचरण, मैत्रीपूर्ण संबंध, आर्थिक नीतिमत्ता आणि बुद्ध धारणा रुजवणारा, महान चक्रवर्ती राजा सम्राट अशोक तूच आहेस राजा. ह्या देशाच्या ध्वजावंर अंकित अशोक चक्राला मनस्वी नमन, चिरायू होवो..!! कोटी कोटी प्रणाम राजा!!
२३२९ व्या सम्राट अशोक जयंतीच्या समस्त मानवतेला मंगलमय सदिच्छा!!
उदय गणपत जाधवलेखक/दिग्दर्शक : ‘देवानंपिय असोक’देवानंपिय असोक



