राष्ट्रीय

हिट अँड रन अपघातात दिनेश बोधिराज यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

पनवेलजवळ भरधाव इर्टिगाची दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक; छातीवरून चाक गेल्याने सात ठिकाणी बरगड्या फ्रॅक्चरअपघातानंतर वाहनचालक न थांबता पसार; आरोपीला अटक करण्याची मागणी, पोलिस तपासावर अमोल बोधिराज यांचे गंभीर प्रश्न!

आम्ही भारतीय / साप्ताहिक

दत्ता अंबोळे, पनवेल :

महाड येथून मुंबईकडे परतत असताना १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास पनवेलजवळील भिंगारी गाव परिसरात झालेल्या भीषण हिट अँड रन अपघातात ‘आम्ही भारतीय’ साप्ताहिकाचे संपादक दिनेश सोमा बोधिराज यांचा जीव थोडक्यात बचावला. त्यांच्या दुचाकीला मागून आलेल्या मारुती सुझुकी इर्टिगा या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दिनेश बोधिराज यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून सात ठिकाणी बरगड्यांना फ्रॅक्चर झाले आहे. दिनेश बोधिराज यांना सदर अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न होता असे दिसून येते. सध्या त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरातील रस्ते सुरक्षा, हिट अँड रन प्रकरणातील पोलिस तपास आणि प्रभावशाली व्यक्तींना मिळणाऱ्या कथित राजकीय संरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लग्नसोहळ्यातून परतताना काळाचा घाला मिळालेल्या माहितीनुसार, दिनेश बोधिराज हे त्यांचे मित्र चेतन हाटे यांच्या १५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विवाहसोहळ्यानिमित्त महाड तालुक्यातील टोल बुद्रुक या गावी १३ नोव्हेंबर रोजी आयोजित हळदी समारंभासाठी गेले होते. रात्री समारंभाला उपस्थित राहून त्यांनी मित्राची भेट घेतली आणि त्यानंतर मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू केला. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू अमोल कुमार प्रभाकर बोधिराज हे दुचाकीवरून प्रवास करत होते. १४ नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारे २.४० वाजता भिंगारी गावाजवळील स्पीडब्रेकर ओलांडत असताना पाठीमागून आलेल्या MH 46 BA 5763 क्रमांकाच्या इर्टिगा कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील दिनेश बोधिराज रस्त्यावर कोसळले. त्यानंतर कारचे पुढील चाक त्यांच्या छातीवरून गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अमोल बोधिराज हेही या अपघातात जखमी झाले. मात्र त्यांना तुलनेने कमी दुखापत झाली. बंधू अमोल बोधिराज यांची प्रसंगावधानता ठरली जीवदान देणारी अपघातानंतर अमोल बोधिराज यांनी दाखवलेली तत्परता दिनेश बोधिराज यांच्या जीवितरक्षणासाठी महत्त्वाची ठरली. अपघातस्थळी त्यांनी तातडीने दिनेश यांचे हेल्मेट काढून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर अपघातात रस्त्यावर पडलेली दुचाकीची नंबर प्लेट आणि संबंधित चारचाकी वाहनाची नंबर प्लेटही त्यांनी उचलून सुरक्षित ठेवली. या पुराव्यांमुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यास आणि पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यास मदत झाल्याचे अमोल बोधिराज यांनी सांगितले. अपघातानंतर अवघ्या पंधरा मिनिटांच्या आत जखमी दिनेश बोधिराज यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. छातीच्या उजव्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याने रक्त साचल्याची परिस्थिती लक्षात घेऊन तातडीच्या वैद्यकीय प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक उपचारांसाठी अमोल बोधिराज यांनी संमतीपत्रावर स्वाक्षरी केली. वेळेत रुग्णालयात पोहोचल्यामुळे आणि तातडीने उपचार मिळाल्यामुळे मोठा धोका टळला.

सात ठिकाणी बरगड्यांना फ्रॅक्चर

एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू या अपघातात दिनेश बोधिराज यांच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून सात ठिकाणी बरगड्यांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर सध्या एमजीएम रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागात उपचार सुरू आहेत. त्यांना आणखी काही काळ वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीची आवश्यकता असल्याची माहिती अमोल बोधिराज यांनी दिली. दरम्यान, अमोल बोधिराज यांची प्रकृती सुधारली असून ते सध्या घरी विश्रांती घेत आहेत. हिट अँड रन प्रकरणात पोलिस तपासावर गंभीर प्रश्न या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.

अपघातानंतर जखमींना मदत करणे, रुग्णवाहिका बोलावणे किंवा पोलिसांना माहिती देणे अपेक्षित असताना वाहनचालकाने तसे केले नसल्याचे अमोल बोधिराज यांचे म्हणणे आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या इर्टिगा वाहनाचा क्रमांक MH 46 BA 5763 असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित वाहनाचा मालक शाम शहा नावाचा असून तो पनवेल-कळंबोली परिसरातील बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती त्यांना मिळाली आहे.

त्यामुळे प्रत्यक्ष अपघाताच्या वेळी वाहन कोण चालवत होते, याचा निष्पक्ष तपास होणे अत्यंत आवश्यक आहे. सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि चालकाची ओळख निश्चित कराया प्रकरणात अमोल बोधिराज यांनी पोलिस तपासाबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

भिंगारी गाव आणि अपघातस्थळाच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने ताब्यात घेण्यात याव्यात.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!