सामाजिक

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री याच्या विरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल

आमचे राम सरळ आहेत, तुमचे कृष्ण वाकडे आहेत - बागेश्वर बाबा

आम्ही भारतीय,साप्ताहिक

अमोल निकाळजे / प्रतिनिधी

नागपूर : भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून कोट्यवधी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित वक्तव्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. करेरा येथील रामकथेदरम्यान कथित वक्तव्यमध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित श्रीरामकथेदरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ‘आमचे राम सरळ आहेत, तुमचे कृष्ण वाकडे आहेत’, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याशिवाय भगवान श्रीकृष्ण यांची देहबोली, रूप, बासरीवादन आणि त्यांच्या दिव्य लीलांची तुलना करणाऱ्या टिप्पण्यांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या वक्तव्यांचा व्हिडिओ विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्याचा दावाराजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ॲड. अक्षय सुभाष समर्थ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. संबंधित वक्तव्यांमुळे स्वतःसह भगवान श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी अशा प्रकारच्या टिप्पण्या करणे आक्षेपार्ह असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या वक्तव्यांचे व्हिडिओ टीव्ही वृत्तवाहिन्यांसह समाजमाध्यमांवरही प्रसारित होत असल्याने त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

नागपूर : बागेश्वर बाबांविरोधात सीताबर्डी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखलबागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून कोट्यवधी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी संबंधित वक्तव्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. करेरा येथील रामकथेदरम्यान कथित वक्तव्यमध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे २९ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित श्रीरामकथेदरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ‘आमचे राम सरळ आहेत, तुमचे कृष्ण वाकडे आहेत’, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याशिवाय भगवान श्रीकृष्ण यांची देहबोली, रूप, बासरीवादन आणि त्यांच्या दिव्य लीलांची तुलना करणाऱ्या टिप्पण्यांचाही तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या वक्तव्यांचा व्हिडिओ विविध वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.कोट्यवधी भक्तांच्या भावना दुखावल्याचा दावाराजीव गांधी पंचायती राज संघटनेचे राष्ट्रीय महासचिव आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ॲड. अक्षय सुभाष समर्थ यांनी ही तक्रार दाखल केली आहे. संबंधित वक्तव्यांमुळे स्वतःसह भगवान श्रीकृष्ण यांच्यावर श्रद्धा असलेल्या कोट्यवधी भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. धार्मिक श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी अशा प्रकारच्या टिप्पण्या करणे आक्षेपार्ह असल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. या वक्तव्यांचे व्हिडिओ टीव्ही वृत्तवाहिन्यांसह समाजमाध्यमांवरही प्रसारित होत असल्याने त्याची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार कारवाईची मागणीया प्रकरणी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २९९ आणि ३०२ अंतर्गत आवश्यक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच करेरा येथे झालेल्या श्रीरामकथेचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरण मिळवून त्याची तपासणी करावी, अशी विनंतीही पोलिसांकडे करण्यात आली आहे. संबंधित वक्तव्यांचा नेमका संदर्भ काय होता, त्यामागील उद्देश काय होता आणि कोणत्या परिस्थितीत ही वक्तव्ये करण्यात आली, याची निष्पक्ष चौकशी व्हावी, असे तक्रारदाराने म्हटले आहे. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यातील कर्तव्यावरील अधिकाऱ्यांनी ही तक्रार स्वीकारली.तक्रार सादर करताना नागरिकांची उपस्थितीॲड. अक्षय समर्थ यांनी तक्रार सादर केली त्यावेळी प्रमोद नरड, ईशान वासू, शुभम खवशी, सुनील ढोले, बाबुलाल साहू, कांचन वराडे, विजय कुर्यवंशी, अभय रणदिवे, राजेंद्र जंगाडे, सूरज शर्मा, कोमल काष्टे आणि धनश्री बनारसे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनीही तक्रारीवर स्वाक्षऱ्या केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित वक्तव्यांची पडताळणी करावी आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ॲड. समर्थ यांनी केली आहे.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!