तुकाराम मुंडे ॲक्शन मोडमध्ये; आरोपी सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
वैध परवान्याशिवाय दुकान चालवत असल्याच्या विविध आरोपांखाली ‘मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी’ तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश

Aamhi Bharatiya / Digital
महाराष्ट्र शासनाचे धडाकेबाज आणि कडक आयएएस (IAS) अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या धडक मोहिमेत पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. संपूर्ण राज्यात गाजलेल्या आणि लोहगड किल्ला परिसरातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयल हिचे वडील प्रवीण गोयल यांच्या मालकीच्या ‘बी. जी. गोयल अँड कंपनी’ या दुकानावर एफडीएच्या पथकाने अचानक धाड टाकली. पुण्याच्या मार्केट yard परिसरात हे मसाले आणि सुकामेव्याचे (dry fruits) दुकान आहे. कारवाईचे नेमके कारण काय?एफडीएच्या तपासणीदरम्यान या मसाला दुकानातून गंभीर अनियमितता समोर आल्या आहेत: विनापरवाना व्यवसाय: हे दुकान चालवण्यासाठी आवश्यक असणारा वैध परवाना (valid food licence) प्रशासनाकडे उपलब्ध नव्हता. निकृष्ट व संशयास्पद माल: दुकानातील मसाल्यांच्या अन्नाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याचे आणि लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले.मोठी जप्ती: अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि भेसळीच्या संशयावरून पथकाने हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन उत्पादनांसह तब्बल ४,१७२ किलो माल (अंदाजे किंमत ₹८.१४ लाख) जप्त केला आणि दुकान तात्काळ सील केले. दरम्यान, दुकानाचे मालक प्रवीण गोयल यांनी यावर प्रतिक्रिया देताना ही कारवाई म्हणजे मुलीच्या प्रकरणामुळे त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही कारवाई पूर्णपणे अन्न सुरक्षेच्या मानकांचे उल्लंघन आणि कायदेशीर तरतुदींच्या आधारे नियमांनुसारच Sanchalit केली गेली आहे. या कठोर कारवाईमुळे अन्न व औषध व्यापारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




