Uncategorized
“मुंढे साहेब आधी आले असते, तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं…” – कॅन्सर ग्रस्त पीडित
“मुंढे साहेब आधी आले असते, तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं…”आषाढी वारीदरम्यान एक हृदयस्पर्शी प्रसंग समोर आला. एका वारकऱ्याने गळ्यात तुकाराम मुंढे यांचा फोटो लावून व्यसनमुक्तीचा संदेश देत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी सामना करत असलेल्या त्या वारकऱ्याने भावनिक शब्दांत सांगितले की, तरुणांनी तंबाखू, गुटखा आणि इतर कोणत्याही व्यसनापासून दूर राहावे. त्यांच्या मते, योग्य वेळी जनजागृती झाली असती तर अनेकांचे आयुष्य वेगळ्या दिशेने गेले असते.स्वतःच्या वेदना बाजूला ठेवून समाजात जागृती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. व्यसनमुक्त जीवन हे केवळ व्यक्तीचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करणारे पाऊल ठरू शकते.