महाराष्ट्र

मानखुर्द मंडला येथील तीन मजली चाळीचे घर कोसळून ५ चिमुकल्यांसह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू

प्रशासनाकडून ढिगारा काढण्याचे काम अजूनही चालूच आहे

आम्ही भारतीय, साप्ताहिक / दिनेश बोधिराज : मुंबईतील मानखुर्द येथील जनता नगर, मंडाला परिसरात मुसळधार पावसादरम्यान तीन मोजले चाळीचे घर कोसळून ५ चिमुकल्यांसह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना रविवारी रात्री घडली असून, बचाव पथकाचे ढिगारा काढण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोलीस मुंबई महानगरपालिकेचे एम पूर्व विभाग कर्मचारी घटनास्थळी जाऊन मदत कार्य करत आहेत.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, चाळ क्र. ५, जनता नगर, हनुमान मंदिरामागे, मंडाला, मानखुर्द.वेळ: रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास मुसळधार पावसामुळे तीन मजली अनधिकृत संरचना शेजारील झोपड्यांवर कोसळली. सदर दुर्घटनेत एका महिलेसह ५ निष्पाप बालकांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी इमारत मालक आणि कंत्राटदाराविरुद्ध एफआयआर दाखल करत दोघांना अटक केली आहे. दुर्घटनेनंतर महाराष्ट्र शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. अपघातानंतर दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!