इराण – अमेरिका युद्धामुळे तांब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंदू मिल येथे उभा करायच्या ४५० फुटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू
युद्धामुळे तांब्याचा दर प्रतिकिलो ८५० रुपयांहून १७५० रुपयांपर्यंत वाढल्याने दुपटीहून अधिक दर वाढल्याने निविदाधारकाने दरातील फरक मिळवण्याची शासनाकडे केली मागणी

तांब्याच्या किमती वाढल्याने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम रखडले; बैठक घेण्याची समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांची मागणीइराण – अमेरिका युद्धामुळे तांब्याच्या दरात मोठी वाढ झाल्यानेइंदू मिल येथे उभा करायच्या ४५० फुटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे.

मुंबईतील इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे ANI/ फाइल फोटो
तांब्याच्या दरवाढीमुळे इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे काम थांबले; संजय शिरसाट यांची मागणीतांब्याच्या किमती वाढल्याने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे काम रखडले; बैठक घेण्याची समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांची मागणी इराण – अमेरिका युद्धामुळे तांब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंदू मिल येथे उभा करायच्या ४५० फुटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे.
Written by आम्ही भारतीय
Updated:November 3, 2026Indu Mill Ambedkar Statue Work Delayed
तांब्याच्या दरवाढीमुळे इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याचे काम थांबले; संजय शिरसाट यांची मागणी
इराण – अमेरिका युद्धामुळे तांब्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंदू मिल येथे उभा करायच्या ४५० फुटांच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संथ गतीने सुरू आहे. या कामासाठी राज्य सरकारने १०८९ कोटी ९५ लाख रुपयांची तरतूद केली होती. यापैकी ७४७ कोटी ७१ लाख रुपयांचा निधीही स्मारकासाठी उभारण्यात आलेल्या प्राधिकरणास देण्यात आला आहे. मात्र, तांब्याचे जुने दर आणि झालेली दरवाढ यामुळे कामाची गती मंदावली आहे. यासाठी दरातील फरक व लागणारा वाढीव निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी अशी मागणी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय शिरसाट यांनी लिहिलेल्या पत्रात पुतळ्याच्या कामास ‘ अपरिहार्य ’ कारणास्तव गती मिळत नाही असे म्हटले आहे. प्रत्यक्षात हे काम सध्या बंदच आहेच. इंदू मिल येथील परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक बनविण्याच्या प्रकल्पास गती देण्यासाठी २०२२ मध्ये सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीकडून प्रकल्पाचा वेळोवेळी आढावा घेण्यात आलेला आहे. पुतळ्याच्या ब्रॉन्झ आवरणाचे काम सुतार फाईन आर्ट यांच्या नोएडा येथील कार्यशाळेत प्रगतीपथावर असून पुतळ्याच्या दोन्ही पायाच्या बुटांचे कास्टिंग पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, या कामात काही अडथळे निर्माण झाले असून मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली तर कामास गती येईल, असे पत्र समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी पाठवले आहे. या अनुषंगाने संजय शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत युद्धामुळे तांब्याचा दर प्रतिकिलो ८५० रुपयांहून १७५० रुपयांपर्यंत वाढला. दुपटीहून अधिक दर वाढल्याने निविदाधारकाने दरातील फरक मिळावा, अशी विनंती केली आहे. अचानक उद्भवलेल्या स्थितीमुळे निविदाधारकांची मागणी अयोग्य नाही. यामुळे अर्थविभाग आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही लवकर बैठक घेऊ असे कळवले आहे. ’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे भव्य ग्रंथालय, वस्तूसंग्रहालय उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मुंबईत होणाऱ्या या स्मारकामुळे पर्यटकही वाढतील, असा सरकारचा दावा आहे. सध्या तांब्याच्या किमती वाढल्याने पुतळ्याचे काम थांबले असल्याच्या वृत्तास शिरसाट यांनी दुजोरा दिला.
4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मार
राज्य शासनाने दिनांक 19 मार्च, 2013 रोजी दादर चैत्यभूमीजवळील इंदू मिल क्र.6, येथील सुमारे 4.84 हेक्टर जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्ती केली. तद्नंतर दिनांक 20 एप्रिल, 2013 रोजीच्या आदेशान्वये सदर स्मारकाच्या विकासासंदर्भात प्राधिकरणाने पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या विहीत केल्या. सदर स्मारक लोकांकरीता असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदरांजली असेल. दि. 11 ऑक्टोबर 2015 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन समारंभ संपन्न झाले. मंजूर संकल्पनेनुसार संपूर्ण जागेची बगीचे असलेले शांती स्थळ म्हणून कल्पना केली आहे, ज्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबीत होईल. स्मारकामध्ये 100 फूट ऊंच पादपीठावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कांस्य धातूने आच्छादीत पुतळा असून पादपीठामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट व पुतळयाच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार उतरंड (spiral ramp) आहे. या व्यतिरिक्त सुमारे 1000 आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह, प्रदर्शनाकरीता दालने, संशोधन केंद्र, ग्रंथालय, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतिक्षालय, उपहार गृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बगिचे, वाहनतळ इत्यादींचा स्मारकामध्ये समावेश आहे. विषयांकित स्मारकाचा भूखंड केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीचा असल्याने त्याचा ताबा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिनांक 25 मार्च, 2017 रोजी हस्तांतरणीय विकास हक्काच्या मोबदल्यात केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडून घेतला आहे.स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची उंची 350 फुटाऐवजी (250 फूट उंच पुतळा + 100 फुट उंच पादपीठ) 450 फूट (350 फूट + 100 फूट उंच पादपीठ) करण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने सादर केलेल्या सुधारीत संकल्पनेस 5 जानेवारी, 2020 रोजी मा. मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.




