श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे जव्हार येथील जिल्हापरिषेद शाळेत दिपोत्सव साजरा
२५० विद्यार्थ्यांना रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी फराळ वाटप करून दिपोत्सव साजरा करण्यात आले

.
आम्ही भारतीय, साप्ताहिक
प्रतिनिधी / आकाश तपासे
ठाणे -: ४ नोव्हेंबर, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही जव्हार येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांन सोबत दीपोत्सव साजरा केला. जिल्हा परिषद वांगणपाडा शाळा, जिल्हा परिषद बोंडारपाडा शाळा, जिल्हा परिषद पिंपळपाडा शाळा, जिल्हा परिषद वडपाडा शाळा या चार शाळेतील २५० विद्यार्थ्यांना रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी फराळ वाटप करून दिपोत्सव साजरा करण्यात आले. या उत्सवा निमित्ताने विद्यार्थना मनसोक्त बोला, आपले विचार मांडा तसेच आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी करा जेणे करून आपण करीत असलेले काम हे आपल्या मनाप्रमाणे असेल असा कान मंत्र देखील देण्यात आले.

त्याच बरोबर यंदा दुष्काळाचे सावड असल्याने प्रत्येकांनी आपल्या शाळेच्या, घराच्या, उद्यानाच्या बहुती एक झाड लावून त्यांची लागवड करणे व पावसाळ्यात बोअरवेल, विहिरी, यांच्या जवळ खोद काम करून आपल्या आवारातून येणारे पावसाचे पाणी जमिनीत मिरवावे जेणे करून उन्हाळ्यात किंवा दुष्काळात येणाऱ्या अडचणींना मात करता येईल असे प्रवृत्तीने उल्लेख करण्यात आले. आजचे भविष्य आपल्या युवकांच्या हाती आहे ते आपल्याला जपले पाहिजे. व फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. फटाके फोडण्यापेक्षा पुस्तक वाचून दिवाळी साजरी करण्याचे प्रामुख्याने मुलांना व उपस्थित सदस्यांना सांगण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे सचिव अजय भोसले, खजिनदार मंगेश निकम सदस्य पद्मा मैथस, निशांत कोळी, पूजा लालगे, अमोल पाटील, वैभवी दाभोळकर, सोहन गुलिंग व इतर सदस्य उपस्थित होते.




