राजकीयराष्ट्रीय

एक फोटो पोस्ट करत राहुल गांधी म्हणतात ; “मोगॅम्बो मोदी आणि त्यांचे गुंड जेवढी दडपशाही करतील, आम्ही तेवढंच उसळून उत्तर देऊ”

संविधानाच्या चिंधड्या उडणार असतील तर आम्ही गप्प बसू असं मुळीच होणार नाही - राहुल गांधी

आम्ही भारतीय, साप्ताहिक

विशेष प्रतिनिधी :

एक फोटो पोस्ट करत राहुल गांधी म्हणतात ; “मोगॅम्बो मोदी आणि त्यांचे गुंड जेवढी दडपशाही करतील, आम्ही तेवढंच उसळून उत्तर देऊ” राहुल गांधी यांनी टीका करत अमित शाह यांचे गुंड रस्त्यावर उतरले आहेत असं म्हटलं आहे.

ग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोचं वर्णन करताना राहुल गांधी म्हणतात की, अमित शाह यांचे गुंड आंदोलकांना मारहाण करत आहेत. तसंच या आंदोलनात सहभागी झालेल्या मुली आणि स्त्रियांचाही विचार करताना दिसत नाहीत, असं म्हटलं आहे. अमित शाह यांचे दिल्ली पोलीस आता गुंडगिरी करत आहेत. RSS-भाजपाच्या गुंडाना महिलांवरही वाट्टेल तशी कारवाई करा अशी मुभा देण्यात आली आहे. त्यांना हिंसा माजवण्यासही काहीही बंदी घातली गेलेली नाही. मॉगेम्बो मोदी आणि त्यांचं सरकार जेवढी दडपाशाही करेल तेवढ्याच ताकदीने युवा वर्ग आणि जेन झी त्याचं उत्तर देतील. १२ ऑक्टोबरला काँग्रेसही सीजेपीच्या मोर्चात सहभागी होणार आहे. देशातले युवक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील. पुन्हा एकदा देशात तरूणाईचा आवाज घुमेल. हा आवाज आधीपेक्षा जास्त असेल हे सरकारने विसरू नये. अमित शाह यांनाही टॅग करत मांडली भूमिकापुढे राहुल गांधी म्हणतात, अमित शाह यांना सांगू इच्छितो, १० हजार, २० हजार, ४० हजार पोलीस आणा, भाजपा, आरएसएसचे गुंड बोलवा आम्ही घाबरणार नाही आणि मागे हटणार नाही. ही लढाई आता मुळीच थांबणार नाही हे तुम्ही पण लक्षात ठेवा. सोमवारी आम्ही सरन्यायाधीशांची भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की देशाच्या संविधानाचे कसे तुकडे केले जात आहेत. अशावेळी कायद्याचे रक्षक म्हणून तुम्ही गप्प बसू शकत नाही. तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून सोयीस्कर भूमिका घेऊ शकत नाही. संविधानाच्या चिंधड्या उडणार असतील तर आम्ही गप्प बसू असं मुळीच होणार नाही. तुम्हाला याबाबत उत्तर द्यावंच लागेल असं राहुल गांधी म्हटले आहेत.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!