चंद्रकांत भंडारे यांचा महाड येथे जाहीर सत्कार !
कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या वतीने मा.चंद्रकांत भंडारे यांचा जाहीर सत्कार ! जाहीर सत्कार

इंदू मिलच्या पाठपुराव्यासाठी कार्य करणारे चंद्रकांत भंडारे यांचा महाड येथे सत्कार महाड येथे जाहीर सत्कार झाला. ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह आणि मनुस्मृती दहन या सामाजिक समतेच्या क्रांतिकारी घटनांना ९९ वर्षे पूर्ण होत असून, शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त कोकण रिपब्लिकन सामाजिक संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची मागणी सातत्याने लावून धरणारे आणि त्यासाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भंडारे यांचा दि. २० मार्च २०२६ रोजी बुटाला हॉल, महाड येथे आयोजित विशेष कार्यक्रमात शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम शताब्दी वर्षाच्या प्रारंभाचा प्रेरणादायी सोहळा ठरला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवचैतन्य देण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

