मंडणगड येथील वेळास येथे मे महिन्यात कासव महोत्सव तर जुलै ऑगस्ट मध्ये दारू महोत्सव ! – दिनेश बोधिराज
कित्येक पर्यटक कासवांची अंडी चोरतात परंतु, त्यांना स्थानिक लोक पकडतात


आम्ही भारतीय, साप्ताहिक :
30 ऑगस्ट 2026 रोजी मंडणगड तालुक्यातील वेळास येथे गेलो होतो. या ठिकाणी वेळच्या समुद्र किनाऱ्यावर मार्च महिन्याच्या शेवटी मे महिन्यापर्यंत कासव महोत्सव असतो. तेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची प्राणी प्रेमींच गर्दी असते. तुळशी मंडणगड मधून आम्ही पंधरा किलोमीटर जाऊन वेळाच्या समुद्र किनाऱ्याला भेट दिली. रस्सा वळणदार चढ उतार असा प्रवास करत शेवटी वेळेच्या छोट्याशा पुलावरती मी ( मोटर सायकल ) बाईक थांबवली. बाईक उभी करून उतरताच क्षणी समोर वृद्ध व्यक्ती परंतु कमी वयाची व्यक्ती शरीराने कमजोर असल्याने काठी हातात घेऊन उभे होती. माझ्या नेहमीच्या स्वभावाने, बाबा वय किती ? नाव काय ? पुढे त्यांना मुलं किती ? मुलं काय करतात अशी विचारणा केल्यानंतर त्यांच्या गरिबीचे दर्शन झाले. त्यांचं नाव होतं अंकुश हरिचंद्र महाडिक, त्यांच्या दोन मुलांचं जेमतेम चौथी / तिसरी शिक्षण झालेलं, त्यामुळे मजुरीच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा रोजगार नाही. मे महिन्यामध्ये हापूस आंबे काढने हे त्यांच्या प्रमुख रोजगाराचे साधन ! त्यानंतर त्या बाबांबरोबर बऱ्याचशा गप्पा झाल्या, आपुलकीची विचारपूस झाली. त्यानंतर सहजरित्या बाबांनी वेळास येथील कासव महोत्सवाची थोडीशी माहिती दिली. मला याची कल्पना होती. मी नेटच्या माध्यमातून ती सर्व माहिती पाहिली होती. परंतु प्रत्यक्षात भेट देण्यासाठी वेळ काही काढता आला नाही. परंतु, या निमित्ताने बाबांच्या तोंडातून निघालेला शब्द पकडून धरला आणि बाबा लागलीच म्हणाले, चला मी दाखवितो ! बाबांना चालता येत नव्हते, काठी धरून ते हळूहळू चालत होते. परंतु आम्ही रस्ता निवडला आमच्या लक्षात आले की, समोर पर्यटकांसाठी बनवलेला भर टाकून उंच केलेला भाग हा तिकडे जाणारा असल्यामुळे आम्ही जोरात चालत जाऊ समुद्रकिनारा गाठला. बऱ्याच वेळ झाला फोटो काढले. त्यानंतर तोपर्यंत बाबा त्या ठिकाणी पोचले. बाबांचा देखील या ठिकाणी इंटरव्यू घेतला त्यांनी कासव महोत्सवाची सविस्तर माहिती दिली. कित्येक पर्यटक कासवांची अंडी चोरतात परंतु, त्यांना स्थानिक लोक पकडतात. तसे बाबांनी सुद्धा केले होते, त्यामुळे प्रशासनाने त्यांना बक्षीसही दिले होते. मी ही बाबांना काही वस्तू बक्षीस देण्यासाठी नसल्याकारणाने खिशात थोडीशी रक्कम होती ती दिली. नंतर बाबांनी मयेकर यांच्याकडे माडी मिळते सांगितल्याबरोबर मी शंभर रुपयाला एक लिटरची बॉटल विकत घेतली.


काही स्थानिक लोक पावसाळ्यामध्ये आत्ता यावेळेस जंगलातून नद्यांमधून सुकलेली जंगली लाकडं वाहत येतात. ती वाहून आलेली सुकलेली लाकडं स्थानिक लोक भारी बांधून जाळण्यासाठी घरी घेऊन जातात. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेला लाकडांचा हा गाळ स्थानिक लोक उचलतात. त्यामुळे हा समुद्रकिनारा या निमित्ताने स्वच्छ होतो. परंतु, ह्या थंड पावसाळ्याच्या वातावरणामध्ये बरेचसे पर्यटक तिथे जाऊन दारू पितात. त्यानंतर तिथे दारू पिऊन काचेच्या बॉटल फोडून टाकतात. दारूच्या काचेच्या बॉटलचे ढिग दिसून आले. दारूवर प्रेम करणारे लोक निसर्गावर तरी प्रेम कसे करतील ! आणि मग परिवारावर सुद्धा कसे प्रेम करतील ? यांच्याकडे देश प्रेमाची अपेक्षाच करू नये !
दिनेश बोधिराज – संपादक




