महाराष्ट्रराजकीय

एससी-एसटी समाजाच्या विकासासाठी राखीव असलेला निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वळविल्याचा आरोप

एससी-एसटी समाजाच्या विकासासाठी राखीव असलेला निधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी वळविल्याच्या आरोपावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमातीच्या समूहांनी सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शहरातील निवासस्थानावर मोर्चा काढल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या ४ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासननिर्णयात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी ₹४९०.३० कोटी उपलब्ध करून दिल्याचा उल्लेख आहे. त्याच निर्णयात या घटकांसाठी योजनेकरिता ₹३,९६० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद नमूद आहे. या शासननिर्णयातील तरतूद आणि आंदोलकांनी ₹४,६०१.१३ कोटीं रुपये लाडक्या बहिण योजनेसाठी वाढविला असल्याचा आरोप होत आहे.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!