शंकराकडून बौद्धांची कत्तल जाति श्रेणीतील त्यांच्या सर्व श्रेष्ठत्वाला आधार देण्यासाठी संस्कृत भाषेत सर्व साहित्य निर्माण करण्यात आले
ब्राह्मण धर्माच्या हिताच्या संधीसाठी आणि जातिपरंपरेच्या समर्थनासाठी १९२७ मध्ये ब्राह्मणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली (RSS)

शंकराकडून बौद्धांची कत्तल जाति श्रेणीतील त्यांच्या सर्व श्रेष्ठत्वाला आधार देण्यासाठी संस्कृत भाषेत सर्व साहित्य निर्माण करण्यात आले होते. अशोकाच्या सत्तेखाली समानता भोगणाऱ्या स्त्रियांचे सामाजिक स्थान आणि इतर नागरी हक्क हिरावून घेण्यात आले. त्यांना अशिक्षित ठेवून सती जाण्यास भाग पाडले. मृत नवऱ्याच्या शरीराबरोबर तिला जिवंत जाळण्यास ब्राह्मण धर्माची कायदेशीर अधिकृत मान्यता होती. त्यांच्या स्वतःच्या घरातील स्त्रियांवरचे क्रूर संकट हृदय फाडणारे होते. जेव्हा कलकत्त्याचेराजा राम मोहन रॉय यांची लहान बहिण लग्नानंतर तीन महिन्यांतच विधवा होऊन सती गेली तेव्हा राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नाने सतीची पद्धत शेवटी ब्रिटिशांनीबंद केली.
ब्राह्मणांनी बौद्ध धर्मग्रंथ आणि पवित्र स्थळांचा अविवेकाने विध्वंस करण्यात समाधान मानले. बुद्धाच्या मूर्ती आणि पुतळे, प्रतिमा विद्रूप करण्यात आल्या. विहार नष्ट करण्यात आले. बौद्ध भिक्षूना मारून टाकणे ही ब्राह्मणांची मुक्त साहसी वृत्ती किंवा व्यवसाय होता. भिक्षू पुष्यमित्राचे शीर आणून देणाऱ्यास १०० दिनार बक्षिस मिळाले. ब्राह्मणांच्या या सर्व मसलती, हल्ले आणि बौद्ध भिक्षूचे खून होऊनही १२ व्या शतकापर्यंत या देशात बौद्ध धर्म जिवंत राहिला. शंकरांचे या पार्श्वभूमीवर आगमन झाल्यानंतर या देशात ब्राह्मण संस्कृतीने पुन्हा एकदा तिचे कुरूप डोके वर उचलले. तो एक गुप्त बौद्ध होता (Praccharia Buddha). मृत होत चाललेल्या ब्राह्मण संस्कृतीला पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याने सर्वांत जोरदार संघर्षाचा प्रारंभ केला. त्याने जाती पुनरुज्जीवित केल्या. बौद्धांवर सर्व प्रकारची हिंसा किंवा वाईट गोष्टी करण्यासाठी त्याच्या अनुयायांना विधिवत नेमले. वेदान्तावरील त्याच्या स्वतःच्या प्रवचनात शिकवणुकीला योग्य किंवा सोयीस्कर अशा बौद्ध धर्मातील तत्त्वांचे त्याने एकत्रीकरण केले. अता दीपो भव (तुम्ही स्वतःच एक दीप व्हा) हे बुद्धाचे पवित्र वचन अहम् ब्रह्मास्मी (मी स्वतःच देव आहे) असे बदलण्यात आले. Anniccha impermanancy (चंचल इच्छा अनिच्छा) ला ‘माया’ असे नाव दिले. तो एकटा इथेच थांबला नाही. तो सर्व भारतभर फिरला आणि बौद्ध विद्वानांबरोबर त्याने चर्चा/वादविवाद आयोजित करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा त्याचा पराभव होणार असे त्याला वाटले तेव्हा त्याच्या बरोबर त्याच्या अनुयायांच्या वेषात असणाऱ्या राजा माधवच्या सैनिकांकडून त्याने बौद्ध विद्वानांना मारून टाकले. देशातून बौद्ध धर्म नष्ट करण्याचा वेदान्ताच्या या प्रवचनकाराने प्रयत्न केला पण हे करताना त्याने देशात अबंधुत्व, असमानता आणि अत्याय यांची अधार्मिक पोकळी निर्माण केली. इस्लामच्या आक्रमणाने ही पोकळी भरून काढली. त्यामुळेच इस्लाम धर्माला आमंत्रण देण्यास ब्राह्मण संस्कृती कारणीभूत किंवा माध्यम बनली. मानवतेच्या विरुद्ध असणाऱ्या त्यांच्या स्वतःच्या वाईट कृत्यांचा हा परिणाम होता. इस्लाम धमनि याचा पूर्ण फायदा घेतला. ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून देशातील काही भागातून ब्राह्मण संस्कृतीचे पूर्ण उच्चाटन झाले किंवा ती समूळ नष्ट झाली. मोगल प्रशासनही ब्राह्मणांनी ताब्यात घेतले. ब्राह्मणेतर, स्त्रिया आणि शूद्रांच्या बाबतीत मन कलुषित करून जातिभेदाने मुस्लीमांची खात्री पटवून दिली. सर्व ब्राह्मण संतांनी मोगल राज्यकर्त्यांची प्रशंसा केली. पण ब्राह्मणेतरांना शाप दिला. माझ्या लिखाणाला तुलसीदासांचे रामायण हा एक जिवंत पुरावा आहे. तो अकबराच्या काळातील एक लेखक होता. ब्राह्मण संस्कृतीचे नियम / निर्बंध ब्रिटिश राज्यकर्त्यांनीही चालू ठेवले. त्यांच्या २०० वर्षांच्या अमलात जातिपरंपरेचे पालन करण्यासाठी त्यांनी ब्राह्मणांच्या धर्मगुरूच्या फसवणुकीला संरक्षण दिले. गांधीजींच्या नेतृत्वाखालील स्वराज्याच्या तथाकथित अहिंसक काँग्रेस चळवळीत त्यांनी मोठ्या संख्येनी भाग घेतला. ब्राह्मणांनी काँग्रेस पार्टीत तसेच खादी भांडारात महत्त्वाच्या जागा /पदे प्राप्त केली. ब्राह्मण धर्माच्या हिताच्या संधीसाठी आणि जातिपरंपरेच्या समर्थनासाठी १९२७ मध्ये ब्राह्मणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली (RSS). RSS चे सदस्य लाखोनी होते. भविष्यात देशात जर एखाद्या क्षणी अराजकता निर्माण झाली तर पुन्हा सत्ता ताब्यात घेणे हे या अर्धसैनिकी संघटनेचे उद्दिष्ट होते. याखेरीज प्रत्येक राजकीय पार्टीचे प्रमुख ब्राह्मणच होते. मग ती एखादी धर्मसभा, ब्राह्मण सभा, रामसभा, कृष्णसभा किंवा इतर कोणतीही धार्मिक सभा असो, ब्राह्मण नेहमीच तेथे प्रमुख होते. मग ती लोकसभा किंवा विधानसभा किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका असो, तेथे ते असतच. अगदी कामगार संघ, चालक संघ किंवा घरगुती नोकर संघातही ब्राह्मण तेथे असायचाच. सर्व ब्राह्मणेतर एखाद्या ब्राह्मण आचाऱ्यालाच निवडायचे. स्वातंत्र्यानंतरही देशाचे पंतप्रधान दुसरे कोणी नसून ब्राह्मणच असायचे. एक कायस्थ (ब्राह्मणेतर). कै. लालबहादूर शास्त्री केवळ अपघातानेच पंतप्रधान झाले. सध्या नेहरूंचा नातू राजीव गांधी पंतप्रधान आहे. त्याने ब्राह्मणांचे हित जपण्याचे घोषित केले आणि स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी रु. ३४० कोटी गंगेचे शुद्धिकरण करण्यासाठी खर्च केले. एखाद्या युनिव्हर्सिटीचा कुलगुरू किंवा कॉलेजचा प्राचार्य किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा संस्थाप्रमुख एखादा ब्राह्मण किंवा वैश्य किंवा क्षत्रियच असू शकतो. याप्रमाणे सर्वत्र ब्राह्मणच होते. भारतीय समाजाच्या आयुष्यातील प्रत्येक वाटचालीत तो सर्वव्यापी होता, असे म्हणता येऊ शकेल. म्हणूनच ८०० दशलक्ष लोकांच्या शुद्धीवर किंवा मनावर तो ताबा ठेवायचा आणि त्या मार्गाने देशावर राज्य करायचा. ब्राह्मण सुसंघटित, शिस्तप्रिय, उच्चशिक्षित आणि दूरदृष्टी असलेले लोक आहेत. या कारणानेच मंदिरे, नद्या, मठ आणि इतर धार्मिक स्थळांची संपत्ती त्यांच्या मालकीची आहे. त्याच्या आशीर्वादानेच हिंदूंचे सर्व सण आणि समारंभ पार पडतात. ७५० धार्मिक समारंभाचे कार्य (संस्कार) दुसरे कोणीही नाही तर तोच एकटा पार पाडतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्वसामान्य हिंदूंच्या धार्मिक समारंभासाठी त्याची सांगड असल्याने जातिपरंपरेत तो सर्वश्रेष्ठ आहे. त्यांनी सरकारांतील सर्व मोक्याच्या जागा प्राप्त केल्या आहेत. भारताच्या जातिनिहाय लोकसंख्येत त्यांचे प्रमाण केवळ ४% आहे पण, लोकांना फसविण्याच्या त्यांच्या कौशल्याने आणि ज्यामुळे त्यांना सर्वश्रेष्ठत्वाची जाणीव होते त्या जाति परंपरेच्या पालनाने ते ९६% लोकांवर वर्चस्व गाजवितात.
ब्राह्मणांची गुप्त बैठक
१९४८ मध्ये के. एम. मुन्शी यांनी हैद्राबाद येथे ब्राह्मणांची एक गुप्त बैठक आयोजित केली. त्यावेळी उर्वरित भारतात निजामाचे राज्य विलिन होईपर्यंत भारताचे हित जपण्यासाठी भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. के. एम. मुन्शी यांनी संपूर्ण भारतातील ब्राह्मणांच्या गुप्त बैठकीचे आयोजन केले. वल्लभभाई पटेलांना आवडले नव्हते, असे म्हटले जाते. नेहरूंचीही याला मंजुरी नव्हती. बहुधा सरदार शूद्र समाजाचे होते, हे त्याचे मुख्य कारण होते. कदाचित त्यांना जातीच्या वर्गीकरणाच्या चिमट्याची जाणीव झाली असावी. संपूर्ण भारतातील ब्राह्मणांचे हित जपण्यासाठी एक गुजराती ब्राह्मण असलेले के. एम. मुन्शी यांनी भारतीय विद्या भवनाची स्थापना केली. स्वतंत्र भारतातील ब्राह्मणांच्या हिताच्या संरक्षणाचा ठराव हैद्राबाद परिषदेत पास झाला होता आणि सर्व ब्राह्मणांना त्याची कडकपणे कार्यवाही करण्याच्या निर्णयाचा प्रसार करण्यात आला. प्रसाराचे माध्यम तोंडी होते. या गुप्त बैठकीतील एका सदस्याने या गुप्त बैठकीतील माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर उघड केली. बाबासाहेब हसले आणि म्हणाले, जातीवर आधारित असलेल्या त्यांच्या हिताचे संरक्षण करणे हा त्यांचा जन्मप्राप्त अधिकार आहे. आता संघटित होऊन या देशावर राज्य करायचे हे ब्राह्मणेतरांवर अवलंबून आहे. किती काळात ब्राह्मण जात, संस्कृती आणि समारंभ यांचा त्याग करून निरुपयोगी म्हणून टाकून द्यायचे हे ब्राह्मणेतरांवर सोडले आहे. जोपर्यंत ब्राह्मणांच्या देवांची पूजा अर्चना करणे चालू आहे तोपर्यंत ब्राह्मण सत्ता गाजवितील. सर्व शूद्र आणि ब्राह्मणेत्तरांनी ब्राह्मणांपुढे संपूर्ण शरणागती पत्करली आहे. म्हणूनच ब्राह्मणांची, लबाड धर्मगुरूंची यात काहीच चूक नाही.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे अनुभव आणि आठवणी लेखक शंकरानंद शास्त्री ग्रंथातून साभार




