राष्ट्रीयशैक्षणिक

लातूरच्या ‘आरसीसी क्लासेस’चे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाचे सर्व ४५ प्रश्न तंतोतंत जुळल्याचे उघड झाले आहे.

मोटेगावकर यांच्या नावाने आलेली केमिस्ट्री विषयाची पीडीएफ व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्याची पुष्टी एका साक्षीदाराने सीबीआय समोर केली आहे

नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी लातूरचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात (फोटो सौजन्य- ANI)

लातूरच्या शिवराज मोटेगावकर यांच्या फोनमध्ये सापडलेले केमिस्ट्रीचे सर्व ४५ प्रश्न मुख्य परीक्षेतील प्रश्नांशी तंतोतंत जुळले!नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. लातूर येथील प्रसिद्ध ‘आरसीसी क्लासेस’चे संस्थापक शिवराज मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेच्या केमिस्ट्री विषयाचे सर्वच्या सर्व ४५ प्रश्न जसेच्या तसे आढळल्याची खळबळजनक माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाच्या तपासातून उघड झाली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांच्या अहवालानंतर सीबीआयने दाखल केलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये ही माहिती समोर आली आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे सीबीआय तपासात काय समोर आलं? सीबीआयच्या तपासादरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, नीट परीक्षेसाठी प्रत्येकी १८० प्रश्नांचे चार ‘मास्टर सेट’ तयार केले जातात. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राच्या प्रश्नांचा समावेश असतो. या चारपैकी दोन संचांची छपाई करून ते परीक्षा केंद्रांवर वितरीत केले जातात. २०२६ च्या परीक्षेसाठी ‘कैलास’ आणि ‘शिवालिक’ हे दोन प्रशासकीय कोडनाव असलेले संच वापरण्यात आले होते.

‘शिवालिक’ सेट:

या संचातील रसायनशास्त्राचे सर्वच्या सर्व ४५ प्रश्न मोटेगावकर यांच्या फोनमध्ये जप्त केलेल्या डाक्यूमेंटमधील प्रश्नांशी तंतोतंत जुळले. ‘कैलास’ सेट: या संचातील ४५ पैकी ४३ प्रश्न लीक झालेल्या दस्तऐवजाशी जुळले. इतर संच: दुसऱ्या मास्टर सेटमधील ४० प्रश्न, तर तिसऱ्या सेटमधील १ प्रश्न लीक झालेल्या माहितीशी जुळला आहे. व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि एअरड्रॉपद्वारे गैर प्रकारा दरम्यान स्पष्ट झाले आहे की, परीक्षेपूर्वीच व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि एअरड्रॉपच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका आणि त्याशी संबंधित साहित्य पसरवण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणी साक्षीदारांचे जबाब, हस्तलिखित नोट्स आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे संदेश तपासून संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला आहे. दिल्लीच्या जलद गती न्यायालयात २८ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या पुरवणी चार्जशीटमध्ये १३ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये एनटीएच्या बायोलॉजी तज्ज्ञ मनीषा मंधारे, केमिस्ट्री तज्ज्ञ प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी आणि फिजिक्स तज्ज्ञ मनीषा संजय हवालदार यांच्या नावांचा समावेश आहे. सराव परीक्षेच्या नावाखाली मुख्य प्रश्नांचा सरावआरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या ‘मॉक टेस्ट’च्या (सराव परीक्षा) प्रश्नपत्रिका दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार:

१९ एप्रिल रोजी घेतलेल्या मॉक टेस्टमध्ये ‘कैलास’ मास्टर सेटमधील १५ प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आले होते. ३० एप्रिलच्या मॉक टेस्टमध्ये ‘शिवालिक’ सेटमधील ६ प्रश्न आणि दुसऱ्या सेटमधील ५ प्रश्न समाविष्ट होते. तसेच आरोपी शिक्षक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या फोनवरून ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान जप्त करण्यात आलेल्या १३ प्रश्नांच्या इमेज तज्ज्ञांच्या अहवालानुसार चारही मास्टर सेटशी जुळल्या आहेत. पैशांची देवाणघेवाण कशी झाली? तपासात उघड झालेल्या माहिती नुसार, जयपूर येथील आरोपी विकास बिवल याला ५,००० रुपयांची आगाऊ रक्कम देण्यात आली होती. यानंतर १ मे च्या आसपास टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेकडो प्रश्नांच्या पीडीएफ फाईल्स फॉरवर्ड करण्यात आल्या. मोटेगावकर यांच्या नावाने आलेली केमिस्ट्री विषयाची पीडीएफ व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्याची पुष्टी एका साक्षीदाराने सीबीआय समोर केली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा सीबीआय कसून तपास करत असून, आगामी काळात आणखी काही बड्या हस्ती अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सराव परीक्षेच्या नावाखाली मुख्य प्रश्नांचा सरावआरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या ‘मॉक टेस्ट’च्या (सराव परीक्षा) प्रश्नपत्रिका दिल्ली विद्यापीठाच्या तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या होत्या.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!