चळवळशैक्षणिक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर येथील मुलांसोबत ज्ञानाची दिवाळी साजरी

सत्यमेव जयते फाऊंडेशन च्या वतीने कळव्यामध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.

आम्ही भारतीय / साप्ताहिक

मंगेश खरात, प्रतिनिधी

सत्यमेव जयते फाऊंडेशन तर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नगर येथील मुलांसोबत ज्ञानाची दिवाळी साजरी.

ठाणे, ४ नोव्हेंबर -: दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळीच्या पूर्वसंध्येला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर कळवा येथील वस्तीतील मुलांना पुस्तकं देऊन ज्ञानाची दिवाळी साजरी करण्यात आली. विविध शैक्षणिक साहित्य वाटप ही यावेळी करण्यात आले. संस्थेचे हितचिंतक संचिता ताई यांच्या सहकार्याने राणा जैस्वाल निशा जैस्वाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुलांना पुस्तकं व खेळण्यासाठी दोर उडी, बुद्धिबळ, कॅरम बोर्ड, रिंग, स्केटिंग आणि वाचनासाठी समाजसुधारक यांची पुस्तक, पोलिस भरती मार्गदर्शन पुस्तक, कृषी मार्गदर्शन पुस्तक, लहान मुलांसाठी विशेष गोष्टीची आणि इंग्रजीची पुस्तके देण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर येणारे हसू जणू उद्याचे भविष्य दिसत आहे. तसेच मुलांना दिवाळी फराळ, खाऊ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य अमोल पाटील, भाग्यश्री गिरी, ज्युली तुपे, रुक्मिणी, प्रियांका कांबळे, दिलीप खंदारे व इतर सदस्य पालक उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क

अजय भोसले अध्यक्ष, ८१०८९४९१०२ सत्यमेव जयते फाऊंडेशन, ठाणे यांच्याशी साधा.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!