जात्यांध, धर्मांध, मानसिकता म्हणजेच क्रूरता, – राजाराम खरात
प्रबोधन कट्टा बदलापूरच्या वतीने खैरलांजी हत्याकांडाची वीस वर्षे व आजचे वास्तव यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते

आम्ही भारतीय, साप्ताहिक
सुभाष रणपिसे प्रबोधन कट्टा बदलापूर
सैतानाला ही लाज वाटावी असं कृत्य खैरलांजी गावात घडल, चारही माय लेकरांना अमानुष पद्धतीने हाल हाल करून त्यांना ठार मारलं, जात्यांध, धर्मांधता किती क्रूर असते, हेच यातून दिसून येतं असं प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आर.के.चे व प्रबोधन कट्टा अध्यक्ष मा. राजाराम खरात यांनी केले. काल प्रबोधन कट्टा बदलापूरच्या वतीने खैरलांजी हत्याकांडाची वीस वर्षे व आजचे वास्तव यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की विद्यमान सरकार ही दलितांना, बौध्दना न्याय नाकारला जातो, उलट अन्याय पीडितांनाच पोलिसांच्या छळाला सामोरे जावे लागले, शालेय विद्यार्थी नितीन आगे, अक्षय सोनावणे, सोमनाथ सूर्यवंशी, नागपूरची मनोरमा कांबळे यांना मृत्यू नंतर ही न्याय मिळाला नाही. नुकतंच मुंबई आयआयटीचा विद्यार्थी साहील वाकोडे याला आत्महत्या करावी लागली. घाटकोपरच्या रमाई नगरात पोलिसांनी गोळीबार करून ११ निष्पाप जीवांचा बळी घेतला,२८ वर्षानंतर ही त्यांना न्याय मिळाला नाही. भूतपूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविद, यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचं शुध्दीकरण करण्यात आले, एवढेच नव्हे तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हलद्वानी मध्ये सभा घेतली, त्या नंतर जागेचे बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी गो मूत्र, शेण, टाकून शुध्दीकरण केले.सरकारने अशा कृत्यांना आळा घालने अपेक्षित होते, मात्र सरकारचं त्यांच्या पाठीशी घालत आहे असं जाणवतं असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.मा. व्हीं, एल, आठवले, संजय शिंदे, गणवीरताई, अशोक गजरमल, प्रदीप कांबळे, यांची समयोचीत भाषणे झाली. मा. सुभाष रणपिसे, यांनी प्रास्तविक केले, तर भाऊ शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. भोतमांगे कुटुंबीयांना सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. सुभाष रणपिसे प्रबोधन कट्टा बदलापूर




