राष्ट्रीय

राहुल नगर वाशी नाका चेंबूर मुंबई येथे बैठकीत सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक पर्वानिमित्त विविध उपक्रमांबाबत चर्चा

वाशीनाका परिसरातील सर्व संवेदनशील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाड क्रांतीच्या शताब्दी वर्षानिमित्त, महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. शनिवार, १८ जुलै २०२६ रात्री ८.०० वाजता राहुल बुद्ध विहार, राहुल नगर वाशी नाका चेंबूर मुंबई या बैठकीत सामाजिक परिवर्तनाच्या या ऐतिहासिक पर्वानिमित्त विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, आदरणीय सोनम वांगचुक यांच्या सुरू असलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा व्यक्त करून केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्याबाबतही चर्चा करण्यात आला. वाशीनाका परिसरातील सर्व संवेदनशील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!