हरामखोरांनो, साहिल वाकोडेचे मागील वर्षाचे IIT ने दिलेले CGPA 8.5 होते; अशाप्रकारे हुशार विद्यार्थ्यांना जातीय मानसिकतेतून त्यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करता ! – दिनेश बोधिराज
माझ्या साहिलला त्यांनी टॉर्चर करुन मारल्याचा आरोप साहिल वाकोडे यांच्या आईने IIT बॉम्बे या शैक्षणिक संस्थेवर केला आहे.

Sahil Wakode : हरामखोरांनो, साहिल वाकोडेचे मागील वर्षाचे IIT ने दिलेले CGPA 8.5 होते. या पलीकडे कोणती गुणवत्ता हवी ! हुशार विद्यार्थ्यांना जातीय मानसिकतेतून त्यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करता, हे आहे का तुमचे मेरिट?
“माझ्या मुलाला टॉर्चर करुन मारलं. मला न्याय पाहिजे. मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे” असा आरोप आयआयटी बॉम्बेत आयुष्याची अखेर करणारा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आईने केला आहे. आयआयटी बॉम्बेमध्ये ‘एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग’ विभागाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने हॉस्टेलमध्ये आयुष्य संपविले आहे. साहिल वाकोडे असे मयत मुलाचे नाव आहे. “या लोकांनी माझ्या मुलाला टॉर्चर करुन मारलं. मला न्याय पाहिजे. मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे” असा आरोप साहिलच्या आईने माध्यमांशी बोलताना केला.
8.5 CGPA म्हणजे काय?
IITमधील CGPA ही साधारणपणे 10-पॉइंट ग्रेडिंग प्रणालीवर आधारित शैक्षणिक कामगिरीची मोजणी असते. 8.5 CGPA ही उच्च शैक्षणिक कामगिरी मानली जाते. साहिल शिक्षणामध्ये “academically strong/bright student” होता. त्याच्या पहिल्या वर्षाचा CGPA 8.5 असल्याचे तसेच कोणताही बॅकलॉग नव्हता. त्याला 2025 च्या JEE Advanced मध्ये 5,000 पेक्षा चांगली All India Rank मिळाले होते. IITसारख्या उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी संस्थेत 10-पॉइंट CGPA प्रणालीमध्ये 8.5 CGPA ही मजबूत शैक्षणिक कामगिरी दर्शवणारी नोंद मानली जाते. जेव्हा एससी एसटी मधील हुशार विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जाते. त्यानंतर उच्चवर्णीय माध्यमातून आणि उच्च वर्ण विचारसरणी मधून बदनामीकारक कारणे देऊन सुरुवातीलाच बदनामी केली जाते.
काँग्रेस पक्षाने आपली भूमिका मांडली आहे.
रोहित वेमुलानंतरही प्रश्न संपले नाहीत…
IIT मुंबईतील साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या मृत्यूने देशाच्या उच्च शिक्षण व्यवस्थेला आरसा दाखवला आहे! रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर ‘संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी होणारा भेदभाव, अपमान आणि मानसिक दबाव’ यावर देशभर चर्चा झाली. दहा वर्षांनंतरही साहिल वाकोडेच्या मृत्यूने तेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. IIT मुंबईने सुरुवातीला साहिलवर परीक्षेदरम्यान मोबाईल आणि ChatGPT वापरल्याचा उल्लेख केला. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वी अशा प्रकारे घटनेचे तपशील सार्वजनिक केल्याबद्दल संस्थेने नंतर माफी मागितली. साहिलच्या कुटुंबीयांनी छळ आणि जातीय अपमानाचे गंभीर आरोप केले आहेत. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून तपास आता मुंबई क्राईम ब्रँचकडे आहे. म्हणून प्रश्न फक्त साहिलचा नाही. विद्यार्थी चुकला असेल तर त्याला प्रक्रिया आहे. पण विद्यार्थ्याचा सन्मान, मानसिक सुरक्षितता आणि न्याय्य वागणूक याची जबाबदारी संस्थांचीही आहे. रोहित वेमुलाच्या प्रकरणातही संस्थात्मक निर्णय, विद्यार्थीविरोधी वातावरण आणि सामाजिक भेदभावाच्या प्रश्नांवर देशभर तीव्र चर्चा झाली होती. मात्र त्याच्या मृत्यूबाबत विविध चौकशांनी वेगवेगळी मते नोंदवली आहेत आणि 2024 मध्ये दाखल झालेला पोलिसांचा closure report नंतर पुढील तपासाची घोषणा झाली. त्यामुळे त्या प्रकरणाला आजही गंभीर सार्वजनिक व कायदेशीर वादाचा विषय मानले जाते. साहिलच्या मृत्यूचं सत्य तपासातून समोर आलंच पाहिजे. आरोपांची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. आणि कोणत्याही विद्यार्थ्याचा जीव जाण्यापूर्वी संस्था त्याचा आवाज ऐकतेय का, हा प्रश्न आता विचारलाच पाहिजे. रोहित वेमुला असो किंवा साहिल वाकोडे…विद्यापीठं विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी असतात, त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी नाहीत.


